रमजानमध्ये नमाज आणि ईफ्तारही घरातच - जिल्हाधिकारी ; मस्जिदमधुन केवळ अजानच होईल - एसपी पोद्दार
बीड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी काल मुस्लिम धर्मगुरूंची रमजानच्या पार्श्वभुमीवर बैठक घेतली. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे रमजानमध्येही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, सुरक्षीत रहा असे आवाहन केले. रमजानमध्येही ईफ्तारनंतर नमाज घरातच अदा करावी असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. तर मस्जिदमधुन केवळ अजानच होईल. त्याठिकाणी नमाजसाठी कोणीही जावु नये असे पोलिस अधिक्षक पोद्दार यांनी सांगीतले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मुस्लिम समाजातील धर्मगुरूंची काल बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती. यावेळी रमजानच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी रेखावार यांनी काही सुचना केल्या. उपस्थित धर्मगुरूंचेही म्हणने ऐकुन घेतले. रमजानमध्येही कोणी आदेशाचे उल्लंघन करू नये, आत्तापर्यंत सहकार्य केल्याप्रमाणे घरातच नमाज अदा करा. ईफ्तारसाठी एकत्रीत न येता आपल्या कुटुबियांसह घरातच ईफ्तार करावा. ईफ्तारच्या खरेदीसाठी कोणीही घराबाहेर पडु नये. सध्या ज्या प्रमाणे भाजीपाला प्रत्येक भागामध्ये वाहनाद्वारे पोहोच केला जात आहे. त्याचप्रमाणे रमजानमध्येही अशी काही व्यवस्था करता येईल का ? त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे रेखावार यांनी सांगीतले. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत मस्जिदमध्ये कोणीही नमाज अदा करण्यासाठी जावु नये. मस्जिदचे मौलवी आणि मोअजम यांनाच केवळ अजान देता येईल. अजाननंतर एकही व्यक्ती मस्जिदमध्ये नमाजसाठी जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी सांगीतले. कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरामध्ये एकत्रीत नमाज अदा करता येईल असे त्यांनी स्पष्ट केलेे.
Add new comment