बीड जिल्ह्यात उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत पुन्हा एक दिवसाआड सूट
बीड दि.14 ( सिटीझन ) राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊनचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड सकाळी 7 ते सकाळी 9.30 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ दिला आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 13 एप्रील 2020रोजीचे सुधारीत अधिसूचना निर्गमित झाली असून लॉकडाऊन दिनांक 30 एप्रील 2020पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्याअर्थी फौजदारी प्रक्रिया दंड सहिंतचे कलम 144 (1)(3) नुसार दिनांक 30 एप्रील 2020 रोजीचे रात्री 12 वा. पर्यंत लागू राहतील. तसेच जिवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या आस्थापना खालील प्रमाणे चालू राहतील. संपुर्ण जिल्हयातील जिवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या किरकोळ विक्री करणाऱ्या आस्थापना हया या कार्यालयाचे संदर्भीय आदेश
दिनांक 8 एप्रिल 2002 मध्ये नमुद केले नुसार सकाळी 7 ते सकाळी 9.30 वा. पर्यंत दिनांक 15, 17,19,21 ,23 ,25 ,27,29 एप्रील
2020 रोजी चालू राहतील. या कार्यालयाचे सदंर्भीय आदेश दिनांक 8 एप्रिल मधील सर्व नियम व अटी जिवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना लागू राहतील. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले संदर्भीय आदेश / सुधारीत आदेश/ सुधारणा आदेश या आदेशासह अमंलात राहतील असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
Add new comment