लाइव न्यूज़
बीडसह राज्यातील ऊसतोड मजुरांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा , सरकारने काढले आदेश
बीड दि.17 ( सिटीझन ) राज्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात , घरी परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आरोग्याच्या दृष्टीकोनातून घालून दिलेल्या नियमांनुसार आता बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना आप आपल्या घरी परतता येणार आहे. राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतल्याने राज्यातील विविध भागातील तब्बल 1 लाख 31 हजार ऊसतोड मजुरांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही आनंद झाला आहे. यासंदर्भात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली असून सोबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीचे पत्रही जोडले आहे.
Add new comment