बीड जिल्ह्यात वृत्तपत्रे वितरणास परवानगी - जिल्हाधिकारी रेखावार
बीड दि.21 ( सिटीझन ) राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्रांच्या छपाईस परवानगी देत वितरणासाठी मात्र सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र मंगळवारी रात्री 9.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात वृत्तपत्र वितरणासाठी परवानगी दिली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे की, कोविड-19 रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करून वृत्तपत्रांना घरोघरी वितरण करता येईल. याबाबतचे आदेश त्यांनी आज काढले आहेत. दरम्यान राज्य सरकारने वृत्तपत्रे सुरू ठेवण्यास परवानगी देत वितरणासाठी मात्र बंदी घातली होतो. या निर्णयामुळे राज्यभरातील वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार, वृत्तपत्रे विक्रेते यांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त करत वृत्तपत्रे वितरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
Add new comment