Add new comment

जिल्ह्याचा विकास शुन्यच;ना.मुंडेंनी जनतेचा विश्‍वासघात केला- विजय लव्हाळे

बीड, (प्रतिनिधी):- देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्ता असुनही बीड जिल्ह्याचा विकास शुन्यच असल्याचा आरोप उदयनराजे सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय लव्हाळे यांनी केला असून ना.पंकजाताई मुंडे यांनी जनतेचा विश्‍वासघात केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
जिल्ह्यात सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. संजय गांधी निराधार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. रोजगार हमी योजनेतही भ्रष्टाचार केला जात आहे. एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहारामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतांना याकडे दुर्लक्ष का? रस्त्यांचे दर्जेदार कामे झाली पाहिजेत मात्र तेही होताना दिसून येत नाही. थातुर-मातुर कामातून श्रेय घेवून ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील जनतेचा विश्‍वासघात केल्याचा आरोप उदयनराजे सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय लव्हाळे यांनी केला आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.