बीड शहर

सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- येथील कालिकानगर भागात राहणार्‍या एका सैनिकाच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
वैशाली नवनाथ बांगर (२५) या विवाहित असलेल्या महिलेने घरात साडीच्या सहाय्याने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली. नवनाथ बांगर हे भारतीय लष्करात असुन वैशालीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांना दोन मुले असुन पुढील तपास पोलिस करत आहेत.

एसपी ऑफीसमध्येच तरूणाचा गोंधळ

मुलीचा पाठलाग करत एसपी ऑफिस गाठले; त्याला रोखणार्‍या पोलिसावर कत्तीने हल्ला

मोबाईल कंपनी टॉवरच्या ८६ हजाराच्या बॅटर्‍यांची चोरी

बीड, (प्रतिनिधी):- मोबाईल कंपनीच्या भेलुरा, पारगाव शिरस आणि अंतरवली येथील टॉवरच्या बॅटर्‍यांचे अंदाजे ८६ हजारांचे सेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सासर्‍याला चाकू दाखवून नवविवाहितेचे अपहरण

जामखेड, (प्रतिनिधी):-ऐन लग्न सराईच्या धामधुमीत जामखेड मध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.  दोन घटनांचे गुन्हे जामखेड पोलिसांत दाखल झाले असून  तिघा जणांविरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  सासरयाला चाकूचा धाक दाखवून नवविवाहितेचे अपहरण करण्याची घटना जामखेड बस स्टँड वरून  तर खर्डा बस स्टँडवरून वडिलांच्या आपरोक्ष सतरा वर्षीय अल्पवयीन तरूणीला बळजबरीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात चार हजार युनिटची विज चोरी केज तालुक्यात विज कंपनीच्या पथकाचे छापे

बीड, (प्रतिनिधी):- विज चोरीचे प्रमाण रोखण्याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून विज वापरली जात आहे. विज कंपनीच्या पथकाने केज तालुक्यात छापे टाकून एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई करत तब्बल ३ हजार ८५३ युनिटची विज चोरी उघड केली आहे. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने अल्पसंख्याक नेतृत्वाचा केसाने गळा कापला!

भाजप ९४, राष्ट्रवादी १६३, कॉंग्रेस २३, शिवसेना ११, एमआयएम ७, अपक्ष आघाड्या ६४, जिल्ह्यात ३६२ मतदान आहे. 

 

जिल्हाप्रमुख खांडेंच्या उपस्थितीत दर सोमवारी दरबाराचे आयोजन

सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना भरवणार पंचायत समितीमध्ये 'जनता दरबार

यु.पी.एस.सी.परीक्षेत यश संपादन केलेल्या भूमीपुत्रांचा ना.पंकजाताई मुंडे यांचे हस्ते मंगळवारी होणार गौरव.

बीड- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीड जिल्हयाच्या भूमीपुत्रांनी यात घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशात उंचावण्याचे काम केले आहे.या भूमीपुत्रांचा गौरव दि.1 मे मंगळवार रोजी जिल्हाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे याच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल राजस्थानी समाज मंडळाच्या वतीने दिलीप लोढा यांनी केले आहे.

आष्टीत शोभेच्या दारूचा  भीषण स्फोट; तिन ठार ?

आष्टी  (प्रतिनिधी) आष्टी शहरातील शेकापुर रोडलगत काही शोभेची दारू विक्री करणाराचे घरे आहेत.त्या घरातील दारूच्या फट्याक्याना आज  दुपारी 4:30 च्या दरम्यान आग लागली असून वेगवेगळे आवाज त्या भागातून येते आहेत. स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे यांचा अंदाज नाही.पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली असून कशामुळे हा प्रकार झाला हे समजू शकले नसले तर या दुर्घनेत तिन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्त लिहिपर्यंत दोघांचे मृूूतदेह बाहेर काढण्यात आले होते. घरात आणखी दोघे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

बीडमध्ये महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण.

बीड, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १ मे २०१८ रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ८.०० वाजता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.

पोनि.सुरेश बुधवंत यांच्या टीमचा आगळा-वेगळा उपक्रम

बीड, (प्रतिनिधी):- रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने बीड वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नियोजन करुन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पाच मिनिटे डोळ्यांसाठी हा उपक्रम राबवून रस्त्यावरील वाहन चालकांना थांबवून त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जात आहे.

बीडमधील डॉक्टरांकडून पंतप्रधान मोदींचा निषेध

आयएमए सदस्यांनी लावल्या काळ्या फिती
बीड,(प्रतिनिधी):- लंडन येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरेबाजी करून प्रामाणिक डॉक्टरांविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमधील डॉक्टरांनी आज निषेध नोंदवला. सकाळपासूनच डॉक्टरांनी काळ्या फिती लावून रुग्ण सेवा केली. आयएमए ( इंडियन मेडिकल असोसिएशन ) च्या सर्व सदस्य डॉक्टरांनी मोदी यांचा निषेध नोंदवला.

र्‍हदयविकाराच्या झटक्याने बब्बू पटेल यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी):- पाचेगावचे सरपंच इम्मु पटेल यांचे बंधू बब्बु सिकंदर पटेल यांचे र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पाचेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बब्बु सिकंदर पटेल यांचे आज सकाळी ९.३० वाजता र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याची माहिती पाचेगाव परिसरातील नागरिकांना कळाली असता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. बब्बू पटेल यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वाजता तकीया मस्जिद येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे. पटेल कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.

नाला व सार्वजनिक मुतारीवर भीमसृष्टी उभारुन बाबासाहेबांचा अवमान करु नका -दिलीप भोसले

बीड,(प्रतिनिधी):- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्रावर आधारित भीमसृष्टी डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या उजव्या बाजूस असलेल्या २० बाय २५ च्या सार्वजनिक नाला व आठवडी बाजारासाठी असलेल्या सार्वजनिक मुतारी तोडून त्या ठिकाणी उभारण्याचा घाट नगराध्यक्षांनी सुरू केला आहे.

अंबाजोगाईत पुढील आठवड्यात मराठवाडा अधिस्वीकृती समितीची बैठक

अंबाजोगाई, (प्रतिनिधी)-मराठवाडा अधिस्विकृती समितीची बैठक ३ मे रोजी अंबाजोगाईत घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अधिस्विकृती समितीचे सदस्य वसंत मुंडे, विभागीय माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, समितीचे सदस्य आसाराम लोमटे,   अनिल वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप (प्रभारी), यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विजेच्या धक्याने शेतकर्‍याचा मृत्यू

जामखेड, (प्रतिनिधी):-शेतातील पानमळ्याला पाणी देत असताना अचानक विजेचा शॉक लागुन प्रगतशील शेतकरी विठ्ठल रामदास मगर याचा जागीच मृत्यू झाला. सहा महीन्यांपुर्वीच विठ्ठल मगर यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता.

डॉ. रामगोपाल बियाणी यांचे निधन

परळी, (प्रतिनिधी):- डॉ.रामगोपाल मदनलाल बियाणी यांचे आज २५ एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षाचे हेाते. दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व.मोहनलाल बियाणी यांचे ते बंधू तर जेष्ठ नेते चंदुलाल बियाणी यांचे ते चुलते होत.

भाजप सरकारने गोरगरीबांच्या योजना बंद पाडल्या - हिरालाल राठोड

बीड, (प्रतिनिधी): भाजप सरकारने राज्यातील जनतेला भुलथापा देवून फसवले आहे. गोरगरीबांच्या अनेक योजना या सरकारने बंद पाडण्याचे काम सुरु केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी  पत्रकार परिषदेत केला. भटक्या विमुक्त घटकांच्या प्रश्‍नांवर बारा बलुतेदारांना सोबत घेवून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Pages