लाइव न्यूज़
सासर्याला चाकू दाखवून नवविवाहितेचे अपहरण
Beed Citizen | Updated: May 5, 2018 - 3:16pm
जामखेड, (प्रतिनिधी):-ऐन लग्न सराईच्या धामधुमीत जामखेड मध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. दोन घटनांचे गुन्हे जामखेड पोलिसांत दाखल झाले असून तिघा जणांविरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सासरयाला चाकूचा धाक दाखवून नवविवाहितेचे अपहरण करण्याची घटना जामखेड बस स्टँड वरून तर खर्डा बस स्टँडवरून वडिलांच्या आपरोक्ष सतरा वर्षीय अल्पवयीन तरूणीला बळजबरीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान जामखेड पोलीसांनी टाळाटाळ करत अखेर गून्ह दाखल केला आहे.
पहील्या ङ्गिर्यादीत नामदेव हरीभाऊ शिंदे ( रा प्रगतीनगर बारामती) नवविवाहितेचे सासरे यांनी यांनी ङ्गिर्यादीत म्हटले आहे की माझा मूलगा सागर नामदेव शिंदे यांचे जामखेड येथील मूलीशी २७ एप्रिल रोजी विवाह झाला. सुनेला येतीजातीसाठी माहेरी घेऊन निघालो.३ मे रोजी सायं ४.१५ वाजता मी व सुन एस टी बसने जामखेड येथे उतरलो. सुनेच्या घरी जाण्यासाठी रिक्षा स्टँड वर रिक्षा पाहत असताना अस्तिक छबू डाडर हा आमच्या जवळ आला व म्हणाला मी सुनेचा आत्या भाऊ आहे. असे ओळख सांगुन घरी सोडतो असे म्हणून पिवळ्या कलरच्या मोटारसायकल वरून आम्हा दोघांना बसवून नगर रोडच्या दिशेने हिमालय पेट्रोल पंपाच्या पुढे डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन गेला व मला म्हणाला की माझं व हिचे संबंध आहेत. माझ्याकडे चाकु आहेत असे म्हणत मला चाकू दाखवून दमदाटी केली तेव्हा सुन चक्कर येऊन पडली तसेच तिला बळजबरीने मोटारसायकलवरून पळवून नेले. नामदेव शिंदे यांच्या ङ्गिर्यादीवरून आस्तिक छबू डाडर (आरोळेवस्ती जामखेड ) याच्याविरुद्ध भादवि ३६३,५०६ नूसार गून्हा दाखल केला असून पुढील तपास पो ना अजिनाथ बडे करत आहेत.
तसेच दूसर्या ङ्गिर्यादीत उत्तम साहेबराव महारनवर वय ४५ रा सावरगांव ता भूम यांनी ङ्गिर्यादीत म्हटले आहे की माझी मूलगी व मी खर्ड्यातील एका दूकानातून कपडे घेऊन बस स्टँड वर आलो असता मूलीला तेथे थांबवून काही किराणा सामान घेऊन परत येईपर्यंत मूलगी थांबलेल्या ठिकाणी आढळून आली नाही मूलीच्या मोबाईलवर ङ्गोन केला आसता सौरभ शरद कोकरे ( रा राजेगांव ता दौंड )गणेश सुरेश सलगर (देवदैठण ता जामखेड) यांनी बळजबरीने मला पळवून नेले आहे असे सांगितले उत्तम साहेबराव महारनवर यांच्या ङ्गिर्यादीवरून सौरभ शरद कोकरे व गणेश सूरेश सलगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बदनामी होईल म्हणून अनेक लोक पोलिसात तक्रार करत नाहीत मात्र जामखेडमधून पळवून नेल्या प्रमाणेच बाहेरूनही जामखेडमध्ये पळवून आणलेल्या अनेक घटनांची चर्चा सुरू आहे यामुळे पालकवर्गात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.
Add new comment