Add new comment

आष्टीत शोभेच्या दारूचा  भीषण स्फोट; तिन ठार ?

आष्टी  (प्रतिनिधी) आष्टी शहरातील शेकापुर रोडलगत काही शोभेची दारू विक्री करणाराचे घरे आहेत.त्या घरातील दारूच्या फट्याक्याना आज  दुपारी 4:30 च्या दरम्यान आग लागली असून वेगवेगळे आवाज त्या भागातून येते आहेत. स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे यांचा अंदाज नाही.पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली असून कशामुळे हा प्रकार झाला हे समजू शकले नसले तर या दुर्घनेत तिन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्त लिहिपर्यंत दोघांचे मृूूतदेह बाहेर काढण्यात आले होते. घरात आणखी दोघे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींची संख्याही मोठी असून स्फोटाच्या तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सदरील घटनेने खळबळ उडाली असून मदतकार्य मोठ्या वेगात सुरू आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.