Add new comment

बीडमध्ये महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण.

बीड, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १ मे २०१८ रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ८.०० वाजता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन समारंभाच्या पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना पूर्व तयारीबाबत सूचना देवून कामांचा आढावा घेतला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८.०० वाजता होणार आहे. तर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी सकाळी ८ वाजता लोकप्रतिनिधींच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.