लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील १३७ तलाठी पदांना सहा महिन्यांची मुदत वाढ
Beed Citizen | Updated: April 25, 2018 - 2:52pm
राज्यातील ४ हजार ६२ तलाठ्यांचा समावेश
बीड, (प्रतिनिधी): राज्यात तलाठी संवर्गाची १२ हजार ६३६ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ८ हजार ५७४ पदे स्थायी असून उर्वरित ४ हजार ६२ पदे अस्थायी आहेत. या सर्व अस्थायी पदांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ३८० मंजूर पदांपैकी १३७ तलाठी पदांना मुदत वाढ मिळाली आहे.
राज्याच्या महसूल विभागाने तलाठी संवर्गातील ४ हजार ६२ अस्थायी पदांना १ मार्च २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तलाठी संवर्गातील कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात तलाठी संवर्गातील ३८० पदे मंजूर असून त्यापैकी २४३ स्थायी तर १३७ अस्थायी आहेत. आजच्या निर्णयामुळे १३७ तलाठी कर्मचार्यांना सहा महिन्यांसाठी मुदत वाढ मिळाली आहे. मराठवाड्यातील १ हजार १० तलाठी संवर्ग पदांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
Add new comment