जिल्हाप्रमुख खांडेंच्या उपस्थितीत दर सोमवारी दरबाराचे आयोजन

सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना भरवणार पंचायत समितीमध्ये 'जनता दरबार
बीड (प्रतिनिधी) पंचायत समिती हा ग्रामपंचायतीना जिल्हा परिषद, राज्य सरकारशी जोडणारा दुवा असतो. यामध्ये ग्रामीण विकासासाठी आवश्यक योजनांची अंमलबजावणी व धोरणांची आखणी होत असते ज्यातून ग्रामीण विकास घडून येतो. मात्र बीड पंचायत समितीत सर्वसामान्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी कुणीच पुढे सरसावत नसल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. पंचायत समितीमध्ये कृषी, पक्षसंवर्धन, रोहयो, शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, इत्यादींच्या सामान्यांच्या गरजेच्या विविध योजना असतात. मात्र बीड पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापना झाली तरी लक्षणीय असे काम दिसून आले नाही. याबरोबरच अधिकाऱ्यांच्या वेळकाडू वृत्तीमुळे येथे आपल्या प्रश्नाची , समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांना रिकाम्या हातीच परतावे लागत असल्याची तक्रारी शिवसेनेकडे आल्या आहेत. यास्तव नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी बीड पंचायत समितीमध्ये 'जनता दरबार' भरवण्याचे जाहीर केले आहे. 
  बीड पंचायत समितीचे उपसभापती हे शिवसेनेचे आहेत. पंचायत समितीतील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी शिवसेना 'जनता दरबाराच्या' माध्यमातून नवे माध्यम सुरु करत आहे. बीड तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांची कामे हि मुख्यत्वे पंचायत समितीमध्ये असतात. मात्र आतापर्यंत या पंचायत समितीमध्ये सामान्यांच्या व्यथांना अन प्रश्नांना सोडवण्यासाठी सत्तेतले कुणीही पुढे येत नव्हते मात्र शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख सामान्यांच्या प्रश्नांसाठी आता आठवड्याच्या दर सोमवारी पंचायत समितीत जनता दरबार भरवणार आहेत. हा जनता दरबार उपसभापतींच्या केबीनमध्ये भरणार आहे. ज्यातून लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद घडून कामे मार्गी लागतील. या जनता दरबाराच्या माध्यमातून आपले पंचायत समितीमधील प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.