लाइव न्यूज़
राष्ट्रवादी कॉंग्रेसने अल्पसंख्याक नेतृत्वाचा केसाने गळा कापला!
भाजप ९४, राष्ट्रवादी १६३, कॉंग्रेस २३, शिवसेना ११, एमआयएम ७, अपक्ष आघाड्या ६४, जिल्ह्यात ३६२ मतदान आहे.
आघाडीतील घडामोडीमुळे परभणीसह मराठवाड्यातील समाज पक्ष नेतृत्वावर नाराज
बीड, (प्रतिनिधी):- परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अल्पसंख्यांक नेतृत्वाचा केसाने गळा कापल्याच्या भावना कार्यकर्त्यांमधुन व्यक्त होवू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदार संघ कॉंग्रेसला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आ.बाबाजानी दुर्रानी समर्थकांनीही संताप व्यक्त केला असुन आघाडीतील पक्षीय घडामोडींमुळे परभणीसह मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाज पक्ष नेतृत्वावर नाराज झाल्याचे दिसुन येत आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूकीतर्ंगत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परभणीतील राजकारणाला वेगळीच कलाटनी मिळाली. राष्ट्रवादीचे मावळते आ.बाबाजानी दुर्रानी यांचा हा मतदार संघ असतांना आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात असतांनाही पक्षीय पातळीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील आघाडीच्या समझोत्यामध्ये परभणीची जागा कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्यांक समाजातील नेतृत्व म्हणून बाबाजानी दुर्रानी यांच्याकडे पाहिले जात आहे.अशा परिस्थितीमध्ये पक्षाने आघाडीचा समझोता करतांना दुर्रानी यांना दूर ठेवल्याची भावना व्यक्त होवू लागली आहे.राष्ट्रवादी कॉंगे्रसने जाणिवपुर्वक अल्पसंख्यांक नेतृत्वाचा केसाने गळा कापल्याची भावना कार्यकर्त्यांमधुन व्यक्त होवू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अल्पसंख्याक नेतृत्वावर केलेल्या अन्यायामुळे परभणीसह मराठवाड्यातील समाज पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसुन येवू लागले आहे.
आ.दुर्राणी यांच्या मनाचा मोठेपणा
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या राज्यस्तरावरील जागा वाटपातील चर्चेनुसार परभणीची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली असल्याची पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी आपणाला सांगितले व उमेदवारी अर्ज भरु नका असेही खा.पवार म्हणाले. त्यामुळे त्यांचा निर्णय आपण मान्य केला असुन यासंदर्भात नाराज झालेल्या कार्यर्त्यांची समजूत काढली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही आ.बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्ट केले आहे. यावरुन दुर्राणी यांच्या मनाचा मोठेपणा दिसुन येतो.
Add new comment