लाइव न्यूज़
Add new comment
मोबाईल कंपनी टॉवरच्या ८६ हजाराच्या बॅटर्यांची चोरी
Beed Citizen | Updated: May 5, 2018 - 3:18pm
बीड, (प्रतिनिधी):- मोबाईल कंपनीच्या भेलुरा, पारगाव शिरस आणि अंतरवली येथील टॉवरच्या बॅटर्यांचे अंदाजे ८६ हजारांचे सेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दि. २२ एप्रिल ते २६ एप्रिलच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बीड तालुक्यातील भेलुरा आणि पारगाव शिरस येथून इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरला लावलेल्या २४ बॅटर्यांचा एक संच याप्रमाणे ५० हजाराचे दोन संच लंपास केले. तर, दि. २३ मार्च रोजी अंतरवली येथील टॉवरच्या बॅटर्यांचा ३६ हजारांचा एक संच लंपास केला. याप्रकरणी गोविंद मचाले यांच्या ङ्गिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर बीड ग्रामीण आणि तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
