डॉ. रामगोपाल बियाणी यांचे निधन

परळी, (प्रतिनिधी):- डॉ.रामगोपाल मदनलाल बियाणी यांचे आज २५ एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षाचे हेाते. दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व.मोहनलाल बियाणी यांचे ते बंधू तर जेष्ठ नेते चंदुलाल बियाणी यांचे ते चुलते होत.
डॉ.रामगोपाल बियाणी रा.गंगाखेड यांचे वृद्धापकाळाने आज २५ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले. गंगाखेड मधील सर्वात जुने डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यंाच्या पश्चात डॉ.मनिष, योगेश ही दोन मुले, पत्नी,दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. परळी येथील दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक मोहनलाल बियाणी यांचे ते भाऊ होत. जेष्ठ नेते चंदुलाल बियाणी, सतिश बियाणी, जगदीश बियाणी, जयप्रकाश बियाणी, ओम्रकाश बियाणी, संतोष, अनिल, सुनिल यांचे ते काका होत. बियाणी कुटुंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.