बीड शहर

बीडच्या पठ्ठ्यानं जगात नाव कमावलं

सडनी, (वृत्तसंस्था):- महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं.राहुलने सव्वा तासात तीन कुस्त्या एकहाती जिंकून ढाण्यावाघासारखी फायनलमध्ये धडक मारली. फायनलध्ये त्याचा मुकाबला कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी विरोधात होता.राहुलची शरिरयष्टी स्टीव्हन ताकाहाशीच्या तुलनेत किरकोळ होती. राहुल ही कुस्ती मारणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र राहुलने पहिल्यापासूनच चित्त्यासारखी चपळाई दाखवली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातर्ंगत सहाशे कर्मचार्‍यांचा झेडपीसमोर ठिय्या

बीड, (प्रतिनिधी):- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणार्‍या जिल्ह्यातील सहाशे कर्मचार्‍यांनी आज सकाळपासुन जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला आहे. दहा ते बारा वर्षांपासुन तुटपुंज्या मानधनावर परिश्रम करुनही शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत आठ वर्षांच्या अनुभवानुसार शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

मुलीवर बलात्कार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्याची घटना चकलांबा (ता.गेवराई) हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध बलात्कारासह पास्को कायद्यातर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात्रेत रक्तरंजित राडा; चौघांना मारहाण करुन पेटवून देण्याचा प्रयत्न

बीड, (प्रतिनिधी):- पिंपळनेरपासुन जवळच असलेल्या गुंदा वडगाव येथील यात्रेत गारीगार खाल्ल्याच्या कारणावरुन वीस ते पंचेवीस जणांनी चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली. यावेळी मारहाण करणार्‍यांनी चौघांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचेही जखमीनीं सांगितले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

धनगर आरक्षणासाठी मेंढरांसह हजारो समाजबांधव रस्त्यावर

लातूर/रेणापूर,(प्रतिनिधी):- धनगर आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी  या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वतीने यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी धनगर समाज नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन मेंढरासह काढण्यात आला या आंदोलनात पारंपरिक वेशभूषेत भांडार्‍याचे उधळण करीत हजारो समाज बांधव उपस्थित होते तोंडाला काळ्या पट्या लावून या ङ्गसनविस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना यशवं

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना

नगर, (प्रतिनिधी):- अहमदनगरच्या केडगाव हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलीय. अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आलीय. त्यात नगर तालुका वूीि मनीष कलवनिया, स्थानिक गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुनील पवार सायबर क्राईम शाखा, सुनील सबकळे पोलीस निरीक्षक तोपखाना पोलिस ठाणे यांची टीम तयार करण्यात आली आहे.

पाण्यासाठी कासारी ग्रामस्थांचे अमरण उपोषण

कासारी, (प्रतिनिधी):- धारुर तालुक्यातील कासारी गावत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्वरित रोहित्र उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची सोया करावी या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. गावालगतचे रोहित्र जळाल्याने आठ दिवसांपासून कासारी गावाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासंबंधी सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अर्जही दाखल केला आहे.

आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून कोपलेंवर हल्ला; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):-सोमवारी सकाळी अंबाजोगाई नगर पालिकेचे स्वीकृत सदस्य कमलाकर कोपले यांच्या प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

विभागीय आयुक्तांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांचा सन्मान

औरंगाबाद, (प्रतिनिधी):- राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडियाच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘चाणक्य’ पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी राज्यस्तरीय ‘पद्मपाणि’ पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांना मिळाल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत, मेहतांची उचलबांगडी?

मुंबई, (प्रतिनिधी):- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा पहिला आणि अखेरचा विस्तार होण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची चिन्हं असून चार नव्या चेहर्‍यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

खंबाटकी घाटात मजुरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोला भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू, २० जखमी

पुणे, (प्रतिनिधी):- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात ३५ कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. आज मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात १८ जण ठार तर २० जखमी झाले. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्‍या या टेम्पोत ( केए -३७/६०३७ ) ३५ पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीप्रश्‍नी बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असुन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत गुंतवल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांना जाचक अटींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत बसपाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मेव्हूण्यासह तिघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- बहिणीकडे वारंवार पैशाची मागणी करणार्‍या मेव्हूण्याने घरी बोलावून घेत अन्य दोघांच्या मदतीने लोखंडी रॉडने एकास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरुन मेव्हूण्यासह तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आ.ठाकूर यांना प्रक्षोभक वक्तव्य भोवणार

बीड, (प्रतिनिधी):- हिंदू धर्मजागृती सभेत आ.राजासिंह ठाकूर यांनी प्रक्षोभक आणि इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याची तक्रार मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने आज दुपारी एसपींकडे केली आहे. भाजप आ.राजासिंह यांनी सभेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यासह सहकारी व सभेच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी घेणार बैठक ; प्रश्न लवकरच मार्गी

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील मोमीनपुरा - अशोकनगर ते बार्शी नाका या भागातील रस्ता रुंदीकरण प्रश्न मागील नऊ महिन्यापासून रखडला आहे. पालिकेतील अंतर्गत गटबाजी , जातीय राजकारण आणि सुडाची भावना यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

संस्था चालक गोडसेंचा प्रताप; नौकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले

बीड, (प्रतिनिधी):- नौकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळून हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत आदर्श मतिमंद निवासी विद्यालय नांदूरफाटा (पांढर्‍याचीवाडी) येथील संस्थापक मनोहर गोडसे यांनी फसवणूक केल्याचा आरोप तात्या गवळी या तरुणाने केला आहे. या प्रकरणी सदरील संस्थाचालकाने बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. मात्र नेकनूर पोलिस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने सदरील तरुणाने आजपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

बीडची कॉंग्रेस रस्त्यावर उतरली!

केंद्र व राज्याच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीसमोर उपोषण

आघाडीच्या नगरसेवकाकडून गुत्तेदाराला धमक्या....! पाणी पुरवठ्याच्या कामात अडथळा- कारवाईची मागणी

बीड , (प्रतिनिधी):- शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक विकास कामे सुरू आहेत. आ.जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी वेगवेगळ्या योजनाच्या अंतर्गत कामासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून धेतला आहे. शहरातील जी कामे सध्या सुरू आहेत ती प्रस्तावित केलेली व मंजूर झालेली कामे आहेत.

बीएसएनएल अधिकार्‍यांकडून ठेकेदारांना झुकते माप तर कामगारांकडे दुर्लक्ष

बीड, (प्रतिनिधी):- बीएसएनएलच्या अधिकार्‍यांकडून ई.ओ.आय.टेंडर अंतर्गत ठेकेदारांना झुकते माप दिले जात असून कमी वेतनावर निष्ठेने काम करणार्‍या कामगारांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्‍नी बीएसएनएल लेबर ऍन्ड कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियन जिल्हा शाखेच्यावतीने आज उपमहाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे.

भवानवाडीत गोठ्याला आग , एक म्हैस दगावली, तीन जखमी.

बीड, (प्रतिनिधी):- तालुक्यातील भवानवाडी येथील एका शेतकर्‍याच्या गोठ्याला  लागलेल्या आगीत एक म्हैस दगावल्याची घटना काल घडली. यासोबतच गोठयाशेजारी असलेल्या कडबा गंजीलाही आगीने वेढल्याने दोन हजारांपेक्षा जास्त कडबा जळून खाक झाला आहे. सदरील शेतकर्‍याचे या घटनेत लाखोंचे नुकसान झाले  आले आहे.  

Pages