लाइव न्यूज़
आघाडीच्या नगरसेवकाकडून गुत्तेदाराला धमक्या....! पाणी पुरवठ्याच्या कामात अडथळा- कारवाईची मागणी
Beed Citizen | Updated: April 9, 2018 - 3:32pm
बीड , (प्रतिनिधी):- शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक विकास कामे सुरू आहेत. आ.जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी वेगवेगळ्या योजनाच्या अंतर्गत कामासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून धेतला आहे. शहरातील जी कामे सध्या सुरू आहेत ती प्रस्तावित केलेली व मंजूर झालेली कामे आहेत. अमृत अटल योजना अंतर्गत सध्या पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शहरात धानोरा रोड येथे ७.२० लक्ष लिटर्स क्षमतेच्या जलकुंभाचे काम सुरू आहे. याच बरोबर अन्य भागातील पाईप लाईनची कामे देखील सुरू आहेत. शहराच्या वाढीव वस्त्या आणि वाढती संख्या लक्षात घेवून त्या भागाच्या मागणीनूसा न.प.मार्फत कामे सुरू असतांना विरोधकाकडून ही कामे होवू नयेत असा प्रयत्न केला जात आहे. केवळ संख्याबळ नसल्यामुळे आम्हाला आतापर्यत कामे करता आली नाहीत. अनेक राबवल्या जाणार्या कामामध्ये विरोधकाकडून जाणिवपुर्वक अडसर सुरू होता.
त्यामुळे शहराची अनेक महत्वाची कामे खोळंबून राहीली होती कामे व्हावीत यासाठी एमआयएमच्या स्वतंत्र गटाने व भाजपा तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी आम्हाला पाठींबा दिला आणि प्रलंबित असलेली कामे सुरू झाली. विशेष म्हणजे नगराध्यक्षनां विशेष अधिकार प्राप्त झाल्यामुळे शहरातील अनेक कामे आता मार्गी लागत आहेत ही कामे झाली तर त्याचे श्रेय मिळणार नाही या हे हेतून विरोधक सुरू असलेली कामे बंद करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आणि गुत्तेदारांना फ ोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. आतापर्यत हेच विरोधक केवळ नगराध्यक्ष खोडा घालत असल्याचे आरोप करत होते. पत्रकबाजी करून जनतेत आम्हीच कामे करत असल्याचे होते परंतू प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे यांना कामे न करता केवळ भ्रष्टाचार करायचा आहे. यासाठीच त्यांची ही धडपड चालू आहे. कुठलाही अघिकार किंवा प्रयत्न न करता सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जायचे आणि नारळ फोडून काम सुरू केल्याचे दाखवायचे असा उद्योग सध्या सुरू आहे.
शहरात सुरू असलेल्या कामांसाठी यांना कोणता निधी कधी व कसा आणला हे सांगावे? पण विकास कामात अडथळा आणून केवळ राजकारण केले जात आहे. कोणत्याही कामासाठी प्रस्ताव दाखल करून मुंबई , दिल्लीच्या खेटा मारून निूधी मंजूर करून घ्यावा लागतो ही साधी गोष्ट जनतेलाही माहीत आहे. आ.जयदत्त आण्णा आणि मा.नगराध्यक्ष हे निवडणूकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्ती करत आहेत. शासनाच्या विविध विभागात सातत्याने पाठपुरावा चालू आहे. त्यास बर्यापैकी यश ही मिळत आहे परंतू विरोधकाकडून सुडाचेच राजकारण केले जात आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कामामध्ये अडथळा निर्माण होवू लागला आहे. खोटया तक्रारी देणे, कर्मचार्यांना धमक्या देणे, सभागृहात आरडाओरड करून आम्ही जनतेसाठी कसे आक्रमक आहोत हे दाखविणे, कर्मचारी मारहाण प्रकरण, कचरा फेक प्रकरण, खोटे कागदपत्र दाखल करून माहिती लपविण्याचे प्रकरण अशा अनेक प्रकरणामुळे विरोधी नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या पायी खालची वाळू सरकू लागली आहे. यातील काहीचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. खालच्या थराला जावून भाषेचा वापर करून काम करणार्यांना धमक्या देवू लागले आहेत. त्यांचे खरे चेहरे आता उघडे पडू लागले आहेत.
आम्ही शहर वासियांना दिलेल्या शब्दांची पुर्तता करणार आहोत, न्याय प्रक्रीयेवर आमचा पुर्ण विश्वास आहे. शहरात कोण कामे करू शकतो हे जनता ओळखून आहे म्हणूनच जनता आमच्या पाठीशी उभी राहून समर्थन देते त्या जनतेच्या कामासाठी आम्ही सतत प्रयत्नशिल राहूत दिलेली आश्वासने आम्ही पुर्ण करून दाखवू विरोधकांनी विकास कामात अडथळा निर्माण करू नये नसता आम्हाला ही कायदा कळतो, विरोध ही करता येतो मात्र आम्ही स्व.काकूं- नानांच्या संस्काराची जान ठेवतो. कामात अडथळा निर्माण करणार्यांचे सदस्यपद रद्द करून त्यांच्या गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. या संदर्भात प्रगती कन्ट्रक्शनच्या वतीने सहाय्यक कार्यकारिअभियंता जीवन प्राधिकरण उप विभाग बीड यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्याधिकारी न.प. बीड यांना सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी पत्र देवून कारवाई करावी असे म्हटले आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती शहर विकास आघाडीचे गटनेते सादेक जमा व पाणी पुरवठा सभापती मुखीद लाला , न.से. भास्कर जाधव, गणेश वाघमारे यांनी दिली अाहे.
Add new comment