राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत, मेहतांची उचलबांगडी?

मुंबई, (प्रतिनिधी):- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा पहिला आणि अखेरचा विस्तार होण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची चिन्हं असून चार नव्या चेहर्‍यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार जवळपास गेल्या वर्षभरापासून रखडला होता. अखेर या विस्ताराला मुहूर्त मिळणार आहे. दिल्ली दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा केली.
चर्चेत चार नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एसआरए घोटाळ्यामुळे बदनाम झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना घरी बसवून राज्यातील सरकारची प्रतिमा धुवून काढण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रकाश मेहता यांनी एसआरए घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत असल्याचा शेरा दिला होता, मात्र विधानसभेतच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळल्यामुळे लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मेहतांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची चिन्हं आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.