Add new comment

मुलीवर बलात्कार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्याची घटना चकलांबा (ता.गेवराई) हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध बलात्कारासह पास्को कायद्यातर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील नारायणवाडी येथील एका १८ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अन्य ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपासुन तिच्यावर अत्याचार केले जात असुन या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन कृष्णा अंबादास नाईकनवरे या तरुणाविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात कलम ३७६ सह पास्को कायद्यातर्ंगत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पीएसआय जोगदंड हे करीत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.