भाजप आ.ठाकूर यांना प्रक्षोभक वक्तव्य भोवणार

बीड, (प्रतिनिधी):- हिंदू धर्मजागृती सभेत आ.राजासिंह ठाकूर यांनी प्रक्षोभक आणि इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याची तक्रार मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने आज दुपारी एसपींकडे केली आहे. भाजप आ.राजासिंह यांनी सभेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यासह सहकारी व सभेच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाकडून आ.ठाकुर यांच्या भाषणाची पडताळणी सुरु असतांनाच शिष्टमंडळाने तक्रार केल्याने आ.ठाकूर यांना प्रक्षोभक वक्तव्य भोवणार असुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता आहे.
बीड येथे रविवार हिंदू जनजागृती समितीच्यावतीने क्रिडा संकुलावर आ.राजासिंह ठाकुर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आक्रमकपणे भाषण करत ठाकुर यांनी सभा जिंकली असली तरी पोलिसांनी या संपुर्ण सभेची व्हिडीओ रेकॉर्डींग केली आहे. त्याची पडताळणी सुरु झाली असुन आ.ठाकुर यांची सर्व वक्तव्य काळजीपुर्वक तपासली जात आहे. या प्रकरणात आज दुपारी मोईन मास्टर, ऍड.शेख शफिक, फारुख पटेल, खुर्शिद आलम, शाहेद पटेल, शेख मतीन, शेख एजाज, आदिंनी एसपींकडे लेखी तक्रार केली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करुन अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच सभेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजप आ.राजासिंह ठाकूर यांच्यासह त्यांचे सहकारी, सभेचे आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा भाषणाची पडताळणी सुरु केली असुन या प्रकरणी आ.ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.