Add new comment

विभागीय आयुक्तांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांचा सन्मान

औरंगाबाद, (प्रतिनिधी):- राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडियाच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘चाणक्य’ पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी राज्यस्तरीय ‘पद्मपाणि’ पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांना मिळाल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी उपायुक्त वर्षा ठाकुर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पारस बोथरा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.