Add new comment

स्काऊट -गाईड राज्य आयूक्त पदी संतोष मानूरकर यांची नियुक्ती

बीड,(प्रतिनिधी ):-महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट -गाईड संस्थेच्या राज्य आयूक्त (स्काऊट) या पदावर बीड येथील संतोष मानूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, स्काऊटचे  राज्याचे  अध्यक्ष  ज्ञानोबाजी मुंडे,राज्य  मुख्य आयूक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते मानूरकर यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले. 
.
बीड जिल्ह्यात स्काऊट -गाईड चळवळ गतीमान करण्यात आली. अनेक उपक्रम राबवत  प्रत्येक शाळे पर्यन्त हि  चळवळ पोहोचवण्यात आल्या मुळे स्काऊटचा  बीड पॅट्रेन  अस्तित्वात आला.   या संपूर्ण कामाची दखल घेऊन बीड येथील जिल्हा मुख्य आयूक्त संतोष मानूरकर यांना राज्य कार्यकारिणी वर  काम  करण्याची संधी मिळाली आहे. राज्य आयूक्त (स्काऊट) या पदावर त्यांची  नियुक्ती झाली असून या संदर्भातील नियुक्ती पत्र नुकतेच मुंबई येथे मान्यवरांच्या   उपस्थितीत देण्यात आले.
.  या पूर्वीचे राज्य आयूक्त  (स्काऊट) श्री. व्ही. एस. काळे यांच्या राजीनाम्या  मुळे हे पद रिक्त झाले होते.  काळे यांच्या कडे आता चळवळीतील आणखी महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.