संस्था चालक गोडसेंचा प्रताप; नौकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले

बीड, (प्रतिनिधी):- नौकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळून हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत आदर्श मतिमंद निवासी विद्यालय नांदूरफाटा (पांढर्‍याचीवाडी) येथील संस्थापक मनोहर गोडसे यांनी फसवणूक केल्याचा आरोप तात्या गवळी या तरुणाने केला आहे. या प्रकरणी सदरील संस्थाचालकाने बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. मात्र नेकनूर पोलिस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने सदरील तरुणाने आजपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
केज येथील फुलेनगर भागातील तात्या लहु गवळी या सुशिक्षित बेरोजगाराने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरिओम शिक्षण प्रसारक मंडळ नेकनूर अंतर्गत आदर्श मतिमंद निवासी विद्यालय नांदूरफाटा (पांढर्‍याचीवाडी) येथील संस्थापक मनोहर गोडसे यांनी भुलथापा देवून माझ्याकडून लाखो रुपये हडक करुन तात्पुरती ऑर्डर देवून शाळेवर रुजू करुन घेतले. कालांतराने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संस्थाचालक गोडसे यांनी ‘तुझी फसवणूक झालेली आहे, परंतु मी तुला तुझे घेतलेले पैसे परत देतो’ असे म्हणत खोटा चेक देवून पुन्हा फसवणूक केली. सदरील पैशांची मागणी केली असता संस्थाचालकाने मारहाण करुन हाकलून दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी १४ जानेवारी २०१८ रोजी पोलिसात तक्रार देवूनही अद्यापपर्यंत पोलिसांनी दखल घेतलेली नाही. नेकनूर पोलिसांनी दखल न घेतल्याने दि.२४ जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक आणि डिवायएसपी केज यांच्याकडेही तक्रार पाठवली. तरी देखील नेकनूर पोलिस कसल्याच प्रकारे तक्रारीचा विचार करत नसल्याने तात्या लहू गवळी या तरुणाने आजपासुन जिल्हाकचेरीसमोर उपोषण सुरु केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.