Add new comment

यात्रेत रक्तरंजित राडा; चौघांना मारहाण करुन पेटवून देण्याचा प्रयत्न

बीड, (प्रतिनिधी):- पिंपळनेरपासुन जवळच असलेल्या गुंदा वडगाव येथील यात्रेत गारीगार खाल्ल्याच्या कारणावरुन वीस ते पंचेवीस जणांनी चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली. यावेळी मारहाण करणार्‍यांनी चौघांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचेही जखमीनीं सांगितले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बीड तालुक्यातील पिंपळनेरपासुन जवळच असलेल्या गुंदा वडगाव येथे वाद झाला. सुरेश नाना लांडगे, रंजना सुरेश लांडगे, नितीन सुरेश लांडगे, रेखा प्रभू रोकडे या चौघांना २५ ते ३० जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या डोक्याला, हाताला गंभीर जखमा झाल्या आहे. मारहाण केल्यानंतर अज्ञात लोकांनी चौघांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे जखमींनी सांगितले. चारही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरील वाद यात्रेत गारीगार का खाल्ले म्हणून झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.