लाइव न्यूज़
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातर्ंगत सहाशे कर्मचार्यांचा झेडपीसमोर ठिय्या
बीड, (प्रतिनिधी):- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणार्या जिल्ह्यातील सहाशे कर्मचार्यांनी आज सकाळपासुन जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला आहे. दहा ते बारा वर्षांपासुन तुटपुंज्या मानधनावर परिश्रम करुनही शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत आठ वर्षांच्या अनुभवानुसार शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी कर्मचार्यांनी केली. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा ईशारा महासंघाने दिला आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या सहाशे कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली शेकडो कर्मचार्यांनी ठिय्या मांडत आपल्या मागण्यांप्रश्नी आक्रमक भुमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सहाशे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असुन या सर्व कर्मचार्यांनी आजपासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. दहा ते बारा वर्षांपासुन तुटपुंज्या मानधनावर कार्य सुरु असुनही शासन या प्रश्नी दखल घेत नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. आठ वर्षांपासुन केलेल्या अनुभवानुसार कर्मचार्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व आर.वाय.कुलकर्णी हे करत असुन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा ईशारा संघटनेचे राज्य सह कोषाध्यक्ष अनिल आष्टेकर, जिल्हाध्यक्ष सचिन भोले यांनी दिला आहे.
Add new comment