बीड शहर

पिंपळनेर तालुका निर्मितीची मागणी; आ.क्षीरसागर, आ.पंडितांचा पाठिंबा

बीड, (प्रतिनिधी):- तालुक्याच्या मागणीवरुन आक्रमक झालेल्या पिंपळनेरकरांनी आज सकाळपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला असुन सर्वांनी एकत्र येऊन एकीची वज्रमुठ आवळली आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी हाक देत एकत्र आलेल्या पिंपळनेरवासियांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आ.जयदत्त क्षीरसागर, आ.अमरसिंह पंडित यांनी उपोषणस्थळी भेट देवून तालुका मागणीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

कारची मोटारसायकलला धडक; मुलगा ठार, आई गंभीर

बीड, (प्रतिनिधी):- भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभिररित्या जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी राजुरीजवळील गजानन कारखान्यासमोर घडला.

शाहीन स्कॉलरशिप ग्रुपच्या परिक्षेस ९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

बीड, (प्रतिनिधी):- कर्नाटक येथील शाहीन स्कॉलरशिप ग्रुपच्यावतीनेे अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नीट २०१८ पुर्व तयारीसाठी आज येथील मिल्लीया शाळेमध्ये परिक्षा घेण्यात आली. बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ९८ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली असुन उर्दू, सेमी आणि इंग्रजी या माध्यमातील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता.

ऍड.शेख शफीक, शाहेद पटेल शिवसंग्राममध्ये

दोन्ही क्षीरसागरांची युज ऍन्ड थ्रो ची निती; आ.मेटेंना देणार गती!

नऊ नगरसेवकांना नगरविकास विभागाने बजावली नोटीस

 कचरा फेकीचा गोंधळ भोवला
१५ दिवसात लेखी खुलासा सादर   करण्याचे आदेश

बीडमध्ये तीन तलाक विधेयकाविरुद्ध ७ एप्रिल रोजी महिलांचा मूक मोर्चा

बीड ( प्रतिनिधी ) संविधानाने सर्व जाती - धर्मांना आपल्या रीती रिवाज जपण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही सर्वजण संविधानाला मानणारे आहोत.  तीन तलाक हे  निमित्त असून शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदरील विधेयक घटनाविरोधी असून त्याबाबत तात्काळ पुनर्विचार करून विधेयक परत घ्यावे या मागणीसाठी दि.

बीड जिल्ह्यातून तिघे हद्दपार

बीड, (प्रतिनिधी):- फसवणूक करणे, अपहरण करणे आणि सरकारी नोकरदारावरील हल्ला प्रकरणासह अन्य स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी  असलेल्या तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी तिघांना बीड जिल्ह्यातून एका वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

मजुर, कामगारांच्या रेट्यानंतर यंत्रणा हलली; चौदा वाळू घाटांचे लवकरच लिलाव

बीड, (प्रतिनिधी):- वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया बंद असल्याने वाळू उपलब्ध होत नव्हती. परिणामी जिल्हाभरातील बांधकामे ठप्प झाल्याने त्याच्याशी संबंधित व्यवसायिक, मजुर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात मजुर, कामगारांनी आंदोलने केली. त्यांच्या रेट्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली असुन जिल्ह्यातील १४ वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबतच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या असुन लवकरच वाळू साठे खूले होतील.

मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची तयारी पुर्ण- आ.जयदत्त क्षीरसागर

बीड,(प्रतिनिधी) ः- येथील काकू- नाना प्रतिष्ठानच्या वतीने विठाई हॉस्पिटल जालना रोड, बीड येथे दि.५,६,७ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात येणार्‍या मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची तयारी जवळपास पुर्ण झाली असल्याची माहिती आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

पालिकेतील एमआयएमचे पदाधिकारी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे!

रस्त्याचे काम रोखण्याचा प्रयत्न, सत्ताधारी असुनही म्हणाले इस्टीमेट दाखवा!
बीड, (प्रतिनिधी): नगर पालिकेतील एमआयएमच्या पदाधिकार्‍यांनी सुभाष रोड, माळीवेस येथील काम रोखण्याचा प्रयत्न केला. कामाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेत इस्टीमेट दाखवण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. सत्तेत सहभागी असूनही चक्क इस्टीमेट दाखवण्याची मागणी केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

वृध्देचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले

जामखेड, (प्रतिनिधी): तालुक्यातील खर्डा भागातील लांडी तलाव परिसरात एका वृध्देचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
खर्डा येथील लांडी तलाव परिसरात नंदा नारायण काळे (वय ७०) या वृध्देचे प्रेत आढळून आले आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा माऊली काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून सपोनि नितीन पगार, पोउपनि. नामदेव सहारे, पो.कॉ. साने, साखरे, जाधव, केकान, सानप, सकट आदींनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. मृतदेह पुर्णपणे कुजलेला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

खा. प्रितमताई म्हणाल्या, ‘मेरा भी सलाम अल्लाह के पास जायेगा!’ पासपोर्ट सेवा केंद्र उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्वागताने खा. मुंडे भारावल्या

बीड, (प्रतिनिधी): ‘मैं ना जा सकी तो क्या... आप लोगों के जरीयेसे मेरा भी सलाम अल्लाह के पास जायेगा’ असे म्हणत पासपोर्ट सेवा केंद्रामुळे हज यात्रेसाठी जाणार्‍या माझ्या मुस्लिम बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याचे खा. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी झालेल्या स्वागताने भारावून गेल्याचे सांगत, पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने असे स्वागत झाले. रेल्वे आणल्यावर तर तुम्ही मला डोक्यावर घेताल, असे सांगण्यासही त्या विसरल्या नाही.

मल्टीपर्पजचे मैदान होवू लागले वाळवंट! हिरवळ वाळली, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष तर उपनगराध्यक्षांनाही फेरफटका मारण्यास मुहूर्त मिळेना

बीड, (प्रतिनिधी): मोठ्या हौशेने मल्टीपर्पजचे मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आलेे. मात्र नव्याचे नवे दिवस या प्रमाणे सध्या मैदानाची दुुरावस्था होवुनही कोणीच लक्ष देईनासे झाले आहे. मैदानावरील हिरवळ पुर्णपणे वाळल्याने त्याला वाळवंटाचे स्वरूप येवू लागले आहे. मैदानावर फक्त धुराळाच दिसू लागल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी होवू लागली आहे. याकडे नगराध्यक्षांचे दुर्लक्ष असून उपनगराध्यक्षांनाही फेरफटका मारण्यास वेळ मिळेना.

अपुरा योगच नशिबी-रजनीताई

बीड, (प्रतिनिधी):- महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले गेले, तेंव्हा मी लोकसभेची सदस्य होते. राज्यसभेत विधेयक मंजुरही झाले अजुनही महिलांना न्याय मिळालेला नाही. मी लोकसभेत असतांना १८ महिन्यात ती बरखास्त झाली. राज्यसभेतही पाच वर्षाची अपुरी टर्मच वाट्याला आली हा अपुरा योगच बहुदा माझ्या नशिबी असावा अशी खंत खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली. निमित्त होते. राज्यसभेतील कार्यकाळ पुर्ण केलेल्या सदस्यांच्या निरोप समारंभाचे.

शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या आत्महत्येचे सत्र सुरुच; दोन दिवसात तिघांनी मृत्यूला कवटाळले

बीड, (प्रतिनिधी):- कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असुन दोन दिवसापुर्वी जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसात तीन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले असुन शासनाकडून होत असलेल्या उपाययोजनाही शेतकरी आत्महत्या रोखू शकल्या नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

शेख असरारबेगम यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी):- येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या शेख असरारबेगम खलीलोद्दीन यांचे काल दुपारी र्‍हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षाच्या होत्या. त्यांचा दफनविधी तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये करण्यात आला.

बीड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना न्यायालयाने बजावले अटक वॉरंट लक्ष्मणनगर भागातील घरे पाडल्याचे प्रकरण

बीड,(प्रतिनिधी):- शहरातील लक्ष्मण नगर भागातील १४ घरे पाडल्याप्रकरणी त्या रहिवाश्यानीं औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात नोटीस बजावूनही सुनावणीला हजर न राहिल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ बीडमध्येही मोर्चा

बीड, (प्रतिनिधी):- संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज सांगलीबरोबरच बीड मध्येही पदयात्रा आणि मोर्चा काढण्यात आला आहे. बुधवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाअधिकारी कार्यालय दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली. भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत संभाजी भिडे यांचा काडीमात्र संबंध नसून त्यांच्यावरील गुन्हा माघारी घेण्याची मागणी यावेळ कण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Pages