लाइव न्यूज़
शेख असरारबेगम यांचे निधन
बीड, (प्रतिनिधी):- येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या शेख असरारबेगम खलीलोद्दीन यांचे काल दुपारी र्हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षाच्या होत्या. त्यांचा दफनविधी तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये करण्यात आला.
बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सेवा बजावल्यानंतर शेख असरारबेगम खलीलोद्दीन सेवानिवृत्त झाल्या होत्या. शहेंशाहनगर येथील निवासस्थानी काल दुपारी त्यांना र्हदयविकाराचा त्रास होवू लागला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेख कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment