Add new comment

अपुरा योगच नशिबी-रजनीताई

बीड, (प्रतिनिधी):- महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले गेले, तेंव्हा मी लोकसभेची सदस्य होते. राज्यसभेत विधेयक मंजुरही झाले अजुनही महिलांना न्याय मिळालेला नाही. मी लोकसभेत असतांना १८ महिन्यात ती बरखास्त झाली. राज्यसभेतही पाच वर्षाची अपुरी टर्मच वाट्याला आली हा अपुरा योगच बहुदा माझ्या नशिबी असावा अशी खंत खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली. निमित्त होते. राज्यसभेतील कार्यकाळ पुर्ण केलेल्या सदस्यांच्या निरोप समारंभाचे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आदिंची उपस्थिती होती.
राज्यसभेतल्या ४० सदस्यांची मुदत मार्च-एप्रिलमध्ये संपत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत निरोप समारंभाच्या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना निरोप देत पीएमओची दारे तुम्हाला सदैव खुली असल्याचे सांगितले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.