Add new comment

कारची मोटारसायकलला धडक; मुलगा ठार, आई गंभीर

बीड, (प्रतिनिधी):- भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभिररित्या जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी राजुरीजवळील गजानन कारखान्यासमोर घडला.
शिरूर तालुक्यातील खोलेवाडी (राक्षसभुवन) येथील अप्पासाहेब बाबुराव खोले (वय ५८) व नानीबाई बाबुराव खोले हे दोघे मायलेकरं बीड येथील रूग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. आज सकाळी मोटारसायकाल (क्रं.एम.एच.१२,सी.एफ.२३६९) ने परत जात असतांना राजुरीजवळील गजानन कारखान्यासमोर समोरून येणार्‍या कार क्रं.(एम.एच.२३, वाय २७११) ने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात अप्पासाहेब खोले आणि त्यांची आई नानीबाई खोले हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना औरंगाबादकडे उपचारासाठी घेवून जात असतांना अप्पासाहेब खोले यांचा वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.