मल्टीपर्पजचे मैदान होवू लागले वाळवंट! हिरवळ वाळली, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष तर उपनगराध्यक्षांनाही फेरफटका मारण्यास मुहूर्त मिळेना
बीड, (प्रतिनिधी): मोठ्या हौशेने मल्टीपर्पजचे मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आलेे. मात्र नव्याचे नवे दिवस या प्रमाणे सध्या मैदानाची दुुरावस्था होवुनही कोणीच लक्ष देईनासे झाले आहे. मैदानावरील हिरवळ पुर्णपणे वाळल्याने त्याला वाळवंटाचे स्वरूप येवू लागले आहे. मैदानावर फक्त धुराळाच दिसू लागल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी होवू लागली आहे. याकडे नगराध्यक्षांचे दुर्लक्ष असून उपनगराध्यक्षांनाही फेरफटका मारण्यास वेळ मिळेना.
बीड शहरातील मल्टीपर्पजचे मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी टाकलेली हिरवळ, झाडे, स्वच्छता पाहून शहराच्या वैभवात भर पडतेय, असे प्रत्येकाला वाटले होते. मात्र नव्याचे नऊ दिवस, याप्रमाणे काही दिवस मैदानाची देखभाल झाली. आता मात्र मैदानाच्या दुरावस्थेकडे पाहण्यासाठी कोणाकडेच वेळ नसल्याचे दिसून येत आहे. मैदानातील हिरवळ पुर्णपणे वाळली असून तेथील वाळलेल्या गवताचा नागरिकांना त्रास होवू लागला आहे. सर्वत्र धुराळा पाहायला मिळत असून मैदानावर येणार्या प्रत्येकालाच त्यापासून त्रास होऊ लागला आहे. हिरवळीवर पाणी न टाकल्याने त्याचे वाळवंट होत असतानाही पालिका प्रशासन आणि संबंधीत गुत्तेदार त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सुरुवातीच्या काळात नगराध्यक्षांनी या मैदानाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. आज मात्र त्यांनाही मैदानाकडे पाहण्यास वेळ मिळेना. मात्र मैदान होताच उपनगराध्यक्ष ही त्याठिकाणी वारंवार जावून तेथील स्वच्छतेसह अन्य बाबींचा आढावा घेत होते. मात्र आता त्यांनाही फेरफाटका मारण्यास वेळ मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली असून परिणामी सकाळी आणि संध्याकाळी येणार्या नागरिकांना तेथील परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
टेंडर घेणारे गुत्तेदार म्हणजे मला पहा अन् ङ्गुले वहा
मल्टीपर्पज मैदानाच्या देखभाल दुरुस्तीचे टेंडर पालिकेने दिलेले आहे. मात्र संबंधीत गुत्तेदाराने लाईट बंद चालू करण्यापलिकडे कोणतीच व्यवस्था केलेली नाही. दुरावस्थेमुळे याठिकाणी गुत्तेदार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थितीत होवू लागला आहे
निजामभाईंना गुत्तेदार दिसतो, मग दुरावस्था का नाही?
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी मल्टीपर्पजचे टेंडर दिल्यानंतर पत्रकबाजी करून पालिकेवर आरोप केले होते.महिनाभरापासून मैदानाची दुरावस्था झाली आहे. मात्र निजामभाईंना गुत्तेदार दिसतो मग दुरावस्था का नाही? असा प्रश्न नागरिकातुन उपस्थित होत आहे.
Add new comment