लाइव न्यूज़
तागडगांवचा नारळी सप्ताह उत्साहात सुरू खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी.
बाबांनी स्त्रीला सन्मान मिळवून दिला.-खा.मुंडे
बीड, (प्रतिनिधी):- मला राजकीय भाषण येत नाही. आणि मला ते करायचेही नाही, मी राजकीय नेता म्हणून आले नाही तर तुमची लेक म्हणून आलेयं असे भावोद्गार काढत भगवान बाबांनी समाजाला एकात्मतेची शिकवण दिली. स्त्रीला सन्मान मिळवून दिल्याचे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले. तर भगवानबाबांनी सर्वधर्म समभाव आणि एकत्मता जोपासल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.
शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील नारळी सप्ताहास आज सुरूवात झाली. ५० एकराच्या जागेत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंडपात ८५ व्या नारळी सप्ताहाच्या सुरूवातीला खा.प्रितमताई मुंडे यांच्याहस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज, अतुल महाराज राख, खा.प्रितमताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, सुरेश नवले,संदीप क्षीरसागर, राधाताई सानप आदींची उपस्थिती होती. यावेळी खा.प्रितमताई म्हणाल्या ,मला राजकीय भाषण येत नाही आणि मला ते करायचे नाही. मी राजकीय नेता म्हणून आले नाही तर तुमची लेक म्हणून तुम्ही मला बोलावलं आणि माझी बाबांवर तुमच्या इतकीच असणार्या श्रद्धेने मी इथे आले आहे.बाबांनी समाजाला एकात्मतेची शिकवण दिली,स्त्रीला सन्मान मिळुन दिला, तिची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होईल असा संदेश दिला.असा पायंडा बाबांनी पडला. त्यासाठी आपण सर्वांनी स्त्रीचा सन्मान करावा म्हणजे बाबांचे विचारांचे आपण खरे पाईक होऊ असे त्या म्हणाल्या.तुमचं आमच्यावर असणार प्रेम आम्हाला कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याचे बळ देत हे प्रेम असेच कायम राहुद्या. तुमच्या प्रेमाचा आम्हाला कधीच गर्व नाहीतर अभिमान राहील. याभागात आणि जिल्हात विकासाच्या कोणत्याही कामाला कमी पडणार नाही असे वचन यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थितीत होते.
मुंडे बहिण-भावाकडून आदरातिथ्य!
तागडगाव येथील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने खा.प्रितमताई मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे एकत्र आले होते. व्यासपीठावर मुंडे बहिण-भावांच्या मध्ये मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज बसलेले होते. उपस्थित भाविकांना संबोधित करतांना धनंजय मुंडे आणि प्रितमताई या दोघांनीही एकमेकांची नावे घेत आदरातिथ्य दाखवून दिले.
Add new comment