बीड, (प्रतिनिधी):- मार्च एण्डच्या पार्श्वभुमीवर पालिकेची कर वसुली मोहीम जोरात सुरु आहे. त्याच पार्श्वभुमीवर पालिकेतील वसुली विभागात कार्यरत सर्व कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असुन शनिवार दि.३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कर स्विकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी दिली आहे.
बीड(प्रतिनिधी) :- संपुर्ण प्लास्टिक बंदीमुळे व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे. सदरील बंदीच्या विरोधात व्यापारी महासंघाने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी व्यापारी महासंघाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेला कैदी ज्ञानेश्वर जाधव हा काल सायंकाळी फरार होण्यात यशस्वी झाला होता. सदरील प्रकरानंतर पोलिसांनी रात्रभर शोध घेत आज पहाटे रेणापूर (जि.लातूर) येथून त्यास जेरबंद केले आहे. दरम्यान रेणापुर येथील प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या फरार कैद्याच्या मुसक्या आवळल्याने पोलिस अधिकार्यांचे कौतुक होत आहे.
बीड,(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदुनामावलीत अनियमितता झाल्याने खुल्या प्रवर्गातील कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाच्या निषेधार्थ खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने २६/०३/२०१८ पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असून विविध सामजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनास वाढत्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे ढाबे दाणाणले आहेत.
मादळमोही, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी मादळमोही ग्रामपंचायत आहे. मादळमोही ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाने १ कोटी ९७ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर केली. या योजनेचे काम पुर्ण झाले असुन देखील मादळमोही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी या योजनेतून मिळत नाही. या विषयी पुढार्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत पत्रकार आणि नागरिकांनी आज रस्त्यावर उतरुन राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ अडवला.
बीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील ग्रामीण पेयजल योजनेचे काम अर्धवट झाले असून हे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हा कचेरीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील संच मान्यतेमध्ये खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतून एकुण २३ शिक्षक विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त झाले होते. या शिक्षकांचे शासनस्तरावरून दि.१३ ऑक्टोंबर २०१७ रोजी ऑनलाईन समाययोजन जिल्ह्यात विविध प्राथमिक खासगी अनुदानित प्राथमिक शाळेत झाले. २३ शिक्षकांपैकी ९ शिक्षकांना रूजू करून घेण्यात आले मात्र १३ शिक्षकांना रूजू करून घेतले नाही. ही प्रक्रिया होवून ६ महिने लोटून गेले आहेत. रूजू करून न घेतलेल्या १३ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
बीड, (प्रतिनिधी):- पीटीआर नक्कल व घरकुल मंजुरीसाठी तीन दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेली महिला मध्यरात्री उपोषणस्थळीच प्रसुत झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दारातच उपोषणार्थी महिलेने एका मुलीला जन्म दिला असुन याबाबत उपोषणार्थी अन्य महिलांनी ही बाब तेथीलच एका पोलिस कर्मचार्याला सांगितली असता ‘मी काय करु’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याचे महिलेच्या कुटूंबियांनी सांगितले.
बीड, (प्रतिनिधी):- नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे ६२ लाख रुपये थकल्याने विज कंपनीने योजनेचे विज कनेक्शन कट केले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये दहा ते बारा दिवसांपासुन पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी असतांनाच आता विज कंपनीच्या कारवाईने दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी, सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी शाळा कायापालट समिती स्थापन करुन स्वत:च्या फंडातून १ कोटी १० रुपयांचा निधी दिला आहे. यासंदर्भात खा.प्रितमताईनीं केंद्रिय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन शाळा कायापालट उपक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, मनपा, न.प.शाळा, महाविद्यालय, कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समोर अनेक समस्या दररोज नवनवीन संकटे उभे राहत आहेत.
मादळमोही, (प्रतिनिधी):-गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे विविध मागण्यासाठी गेवराई तालुका ग्रामिण पत्रकार संघाच्या वतिने मादळमोही राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वर दि.२७ मार्च रोजी रस्ता रोको अंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील संपादक,मिडीया प्रतिनिधी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील तांबवा येथे घडलेली घटना शुल्लक कारणावरुन घडल्याचे समोर आले असुन या प्रकरणी मयत पतीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अंगणवाडी सेविकेची नौकरी सोडत नसल्याने त्याचा अपमान होवू लागला. तो अपमान सहन न झाल्याने पतीने पत्नीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बीड, (प्रतिनिधी):- शाहेद पटेल यांच्या पटेल फाउंडेशनच्यावतीने आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीरास पत्रकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत अनेक पत्रकारांची रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी माजीमंत्री बदामराव पंडित आणि नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाल पॅथलॅब्सचे उद्घाटन करण्यात आले.
बीड, (प्रतिनिधी):- श्रीराम नवमीनिमित्त जिल्हाभरात सकाळपासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बीड शहरात बार्शीनाका येथून भव्य-दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगव्या पताकांनी लक्षवेधी ठरलेली रॅली शहरातील आंबेडकर चौक-माळीवेस-धोंडीपुरा-बलभीम चौक-बशिरगंज-शिवाजी चौक-नगरनाकामार्गे पुन्हा साठे चौक या रस्त्यावरुन आंबेडकर चौक येथे पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारनंतर कंकालेश्वर मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
बीड, (प्रतिनिधी):- अधिकृत फार्मासिष्ट शिवाय औषधी दुकानावर होणारी औषधी गोळ्याची विक्री थांबवावी तसेच कंत्राटी फार्मासिष्टना सेवेत कायम करुन रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी एकमुखी मागणी बीड जिल्हा फार्मासिष्ट कृती समितीच्या शनिवारी बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात करण्यात आली.
बीड (प्रतिनिधी): स्वार्थाच्या या जगामध्ये ‘मी आणि माझं’ असंच काहीसं सुत्र बनलं आहे. आपलं तर आपलंच परंतू दुसर्याचं कसं ओरबाडून घेता येईल याचे किस्से अनेक ? परंतू रस्त्यावर सापडलेली अज्ञात व्यक्तीची बॅग त्यातील पैसे कागदपत्रे हे आपले नाहीत याची जाणीव मनात ठेवून ती अमानत त्याची त्याला परत करून तालेबभाईंनी इमानदारी दाखविली. हरवलेली मुळ कागदपत्रे आणि पैसे परत मिळाल्यामुळे प्रिया चौधरी हिचाही आनंद गगनात मावला नाही. लोभाच्या या जगामध्ये तालेबभाई सारखी माणसे आजही आहेत ही सर्वांसाठीच प्रेरणादायी बाब आहे त्यामुळे त्यांच्या या इमानदारीला आमचाही सलाम !