बहुजन शिक्षक संघटनेची स्थापना-समुद्रे

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, मनपा, न.प.शाळा, महाविद्यालय, कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समोर अनेक समस्या दररोज नवनवीन संकटे उभे राहत आहेत. या संकटावर मात करुन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या शिक्षकांची एकी करुन शिक्षकांवरील होणारा अन्याय दूर करणे त्यांच्या हक्क व न्याय मिळवून देणे शिक्षकांचे जिवनमान उंचवणे व शिक्षकांचा विकास निस्वार्थ करणे,  जिवनाथ स्थैर्या प्राप्त करुन देणे ह्या उद्दात हेतूने निस्वार्थ सेवा व राजकारण विरहित कोणत्याही राजकीय पक्षास सलग्न न राहता शिक्षक हाच पक्ष व त्याला न्याय हक्क प्राप्त करुन देणे व शिक्षकाचा विकास म्हणजे समाजाचा विकास एकमेव भावनेनेे, बहुजन शिक्षक संघटनेची, श्रमिक संघ अधिनियम १९२० अंतर्गत नोंदणी क्रमांक एडब्यूबी/३१२४/२०१८ नुसार स्थापन केली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यासाठी बहुजन शिक्षक संघटनेची शाखा व सभासद नोंदणी व पदाधिकारी निवड सुरु आहे. संघटनेमध्ये बहुसंख्येने शिक्षकांनी सामिल व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार समुद्रे, प्रकाश गाडे, अंकुश राठोड, विवेकानंद शेळके, विनोदकुमार कांबळे, नामदेव वाघ, महेश झणझणे, इमाण मिर्झा, मुकंद खांडे, प्रविण सानप, प्रज्ञा शिंदे, वाघमारे, डी.एस.योगेश सोळसे यांच्यावतीने करण्यात येत आहे. संपर्क संत नामदेव नगर धानोरा रोड बीड ता.जि.बीड या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.