Add new comment

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ बीडमध्येही मोर्चा

बीड, (प्रतिनिधी):- संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज सांगलीबरोबरच बीड मध्येही पदयात्रा आणि मोर्चा काढण्यात आला आहे. बुधवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाअधिकारी कार्यालय दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली. भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत संभाजी भिडे यांचा काडीमात्र संबंध नसून त्यांच्यावरील गुन्हा माघारी घेण्याची मागणी यावेळ कण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथेही आज संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जात आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संभाजी भिडे यांच्यावरील गुन्ह माघारी घेण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल आहे. याावेळी मंदारबुवा रामदासी, शहाजी जावे, सुभाष निंबाळकर, भास्कर कोल्हे, विजय दुबे, सुनिल निंबाळकर, गणेश जाधव, अशोक शेळके, जयराम शेळके, सुदर्शन धांडे, अनिकेत हरी, विठ्ठल शेळके उपस्थित होते. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.