संपादक शेख मुजीब यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

हुसैन वेलफेअर सोसायटीकडून  विविध क्षेत्रातील व्यक्तींचा ६ एप्रिल रोजी गौरव
बीड, (प्रतिनिधी):- येथील हुसेन वेलफेअर सोसायटीच्यावतीने देण्यात येणारे शहीद अश्फाकउल्ला खान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. सायं दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब यांचाही त्यामध्ये समावेश असुन त्यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दि.६ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सोसायटीचे सचिव शेख अजिज हुसेन यांनी दिली आहे.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा उपक्रम हुसेन वेलफेअर सोसायटीच्यावतीने राबवण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोसायटीच्यावतीने शहीद अश्फाकउल्ला खान राज्यस्तरीय विशेष पुरस्कार, समाजरत्न, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. समाजरत्न पुरस्कार सायं दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब यांना जाहीर झाला आहे. माध्यमिक विभागाच्या उप शिक्षणाधिकारी श्रीमती उस्मानी नजमा सुलताना, मिल्लीया ग्रुपच्या श्रीमती खान सबिया बेगम यांना शहीद अश्फाकउल्ला खान यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याच बरोबर मिल्लत ग्रुपचे उमेर सलीम, पत्रकार सिराज आरजू, जे.डी.शाह, शेख तय्यब बशिर, मजहर खान हबीब खान, ऍड.सय्यद यासेर पटेल यांना समाजरत्न तर प्रा.राजेंद्र गाडेकर, फारोखी शफियोद्दीन, शेख ताजोद्दीन मैनोद्दीन, शेख सिराज महंमद, डॉ.सय्यद जुबेर हुसेनी, शेख कय्युम रज्जाक, शिवलिंग वसंतराव क्षीरसागर, सचिन हुलजुते, तनवीर पठाण, मोमीन बिलाल, खतीब सय्यद, अभिमान पायाळ, प्रा.शहादेव वीर, श्रीमती अर्चना गायकवाड, लताबाई ससाणे, हाफिज पठाण शरीफ खान, नरसिंग इंगळे, अजमोद्दीन बागवान, डॉ.सत्यनारायण ढवळे, विजय सातपुते, शेख उमर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दि.६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष शेख अजीज, बिलाल खान, रफिक पटेल, अनिस सर, डॉ.मुबारक, हुजीर सर, प्रा.शरद वंजारे, डी.एन.काळे, डॉ.शेख मन्सूर आदिंनी कळवले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.