लाइव न्यूज़
मादळमोहीत पत्रकार, नागरिकांनी प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठीराष्ट्रीय महामार्ग अडवला
मादळमोही, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी मादळमोही ग्रामपंचायत आहे. मादळमोही ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाने १ कोटी ९७ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर केली. या योजनेचे काम पुर्ण झाले असुन देखील मादळमोही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी या योजनेतून मिळत नाही. या विषयी पुढार्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत पत्रकार आणि नागरिकांनी आज रस्त्यावर उतरुन राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ अडवला. रस्त्यावरच ठिय्या मांडून बसल्याने वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती.
मादळमोही येथे आज रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ग्रामीण पत्रकार संघ आणि नागरिकांनी जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर एकत्र येऊन महामार्गावरील वाहतुक अडवली. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हक्कदार यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पाणी पुरवठा योजना मंजुर होवूनही काम न झाल्याने ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ आली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. यावेळी पाणीपुरवठा योजनेसह अन्य मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
Add new comment