लाइव न्यूज़
अधिकृत फार्मासिष्ट शिवाय दुकानावरील औषध विक्री रोखा बीड जिल्हा कृती समितीच्या मेळाव्यातील एकमुखी मागणी
बीड, (प्रतिनिधी):- अधिकृत फार्मासिष्ट शिवाय औषधी दुकानावर होणारी औषधी गोळ्याची विक्री थांबवावी तसेच कंत्राटी फार्मासिष्टना सेवेत कायम करुन रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी एकमुखी मागणी बीड जिल्हा फार्मासिष्ट कृती समितीच्या शनिवारी बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात करण्यात आली.
शहरातील मुक्ता लॉन्समध्ये जेष्ठ फार्मासिष्ट डी.एम.सत्वधर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी सचिन भालेकर (पुणे), जयदत्त थोटे, पांडुरंग कुर्हे, महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती चव्हाण, योगेश जोशी, सोमनाथ धांडे, सचिन बेंगडे, विकास होके, सचिन लातूरकर, शेख शकील (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात फार्मासिष्ट क्षेत्रातील विविध समस्यावर चर्चा करुन विविध ठराव घेण्यात आले. त्यामध्ये औषधी दुकानाचा प्रोप्रायटर हा फार्मासिष्टच असावा. कामगार कायद्यानुसार शासकीय फार्मास्ष्टिच्या वेळा निश्चित कराव्यात. शासकीय सेवेतील कंत्राटी फार्मासिष्टांना सेवेत कायम करावे. शासकीय सेवेतील कर्मचार्यांची श्रेणी शैक्षणिक आधारीत पात्रता (आर.आर) अद्यावत करुन त्यानुसार वेतनश्रेणी लागू करावी. मोठ्या हॉस्पिटलशी संलग्न औषधी दुकानात २४ तासासाठी एकच फार्मासिष्ट न राहता कामगार कायद्यानुसार कामाच्या वेळा निश्चित करुन त्या ठिकारी तीन फार्मासिष्टची नेमणूक करण्यात यावी.
महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असो. कडून २००६ साली राज्यातील फार्मासिष्टकडून करोडो रुपयेह शेअर्सच्या नावाखाली गोळा करण्यात आले. त्याचा हिशोब देऊन जमा रक्कमा व्याजासह त्या त्या फार्मासिष्टना परत करण्यात याव्यात. शासकीय नौकरीमध्ये स्थानिक (महाराष्ट्रातील) लोकांनाच प्राधान्य द्यावे. औषधी निर्मिती कंपनीमध्ये फार्मासिष्टचीच भरती प्राधान्याने करुन फार्मासिष्टची बेरोजगारी कमी करावी. डॉक्टरांची रुग्णाला ठराविक औषध कंपन्याची औषध सुचवण्याची मक्तेदारी संपुष्टात आणून फार्मासिष्टनाच रुग्णांना औषध गोळ्या सूचवण्याची परवानगी देण्यात यावी. अशा मागणीचा ठराव घेण्यात आला असुन शासनाने या बाबत ठोस कारवाई न केल्यास कृती समिती भविष्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. या मेळाव्यात बीड जिल्हा फार्मासिष्ट कृती समितीची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी बालाजी बहिरवाळ यांची निवड करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयदत्त थोटे यांनी केले तर सुत्रसंचलन देवेंद्र नेवळे यांनी केले या मेळाव्याला बीड जिल्ह्यातील फार्मासिष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment