लाइव न्यूज़
शाळा कायापालटसाठी खा. प्रितमताई मुंडे यांनी घेतली ना. प्रकाश जावडेकर यांची भेट
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी, सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी शाळा कायापालट समिती स्थापन करुन स्वत:च्या फंडातून १ कोटी १० रुपयांचा निधी दिला आहे. यासंदर्भात खा.प्रितमताईनीं केंद्रिय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन शाळा कायापालट उपक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर ना.जावडेकर यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करुन चांगल्या कार्यात माझा सक्रिय सहभाग असेल आणि त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान खा.प्रितमताईंच्या महत्वकांक्षी संकल्पनेला मुर्त स्वरुप मिळू लागले असुन लवकरच जिल्ह्यातील शाळांचा कायापालट होणार आहे.
बीडच्या खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रिय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच भेट घेतली. प्रथम राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल खा.प्रितमताईनीं ना.जावडेकर यांना शुभेच्छा देवून बीड जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळांना गत वैभव मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या शाळा कायापालट उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा परिषदांच्या शाळेत शेतकरी, कष्टकर्यांची मुले शिक्षक घेत असुन शाळांची ठिकठिकाणी पडझड झाली असुन त्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यासाठी शाळा कायापालट समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी स्वत:च्या फंडातून १ कोटी १० रुपयांचा निधी आपण दिल्याचे खा.प्रितमताईनीं सांगितले. यावेळी ना.जावडेकर यांना प्रितमताईनीं शाळा कायापालट उपक्रमाची माहिती सांगून आपण या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. ना. प्रकाश जावडेकर यांनी यावेळी खा. प्रितमताई मुंडे यांचे अभिनंदन करून या चांगल्या कार्यात माझे आणि सरकारचे पुर्ण सहकार्य असेल असे सांगत मी या चांगल्या कामात सोबत असल्याचे त्यांनी संगितले. शाळा कायापालट कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार्या खा. प्रितमताई मुंडे यांना ना. पंकजाताई मुंडे यांच्या सोबत ना. प्रकाश जावडेकर यांची साथ मिळणार असल्याने जिल्ह्यातील विद्यामंदिरे सुंदर,स्वच्छ,आणि प्रसन्न होऊन चांगले ज्ञान मुलांना देण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे
Add new comment