Add new comment

पटेल फाउंडेशनच्या रक्त तपासणी शिबीरास पत्रकारांचा प्रतिसाद लाल पॅथलॅब्सचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

बीड, (प्रतिनिधी):- शाहेद पटेल यांच्या पटेल फाउंडेशनच्यावतीने आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीरास पत्रकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत अनेक पत्रकारांची रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी माजीमंत्री बदामराव पंडित  आणि नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाल पॅथलॅब्सचे उद्घाटन करण्यात आले.
बीड येथील युवा नेते शाहेद पटेल यांच्या पटेल फाउंडेशनच्यावतीने आज पत्रकारांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील पत्रकारांनी शिबीरामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्त तपासणी करुन घेतली. यावेळी लाल पॅथलॅब्स लाईफ केअर पॅथालॉजीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री बदामराव पंडित, डॉ.योगेश क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, मोईन मास्टर, विलास बडगे आदिंची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांचे स्वागत पटेल फाउंडेशनचे शाहेद पटेल यांच्यासह बाळासाहेब पन्हाळे, शेख अन्वर व मित्र परिवाराने केले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.