लाइव न्यूज़
पत्नी अंगणवाडी सेविकेची नौकरी सोडून देत नसल्याने त्याने संपविले दोघांचे जीवन तांंबव्यातील घटना शुल्लक कारणावरुन
Beed Citizen | Updated: March 25, 2018 - 4:32pm
बीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील तांबवा येथे घडलेली घटना शुल्लक कारणावरुन घडल्याचे समोर आले असुन या प्रकरणी मयत पतीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अंगणवाडी सेविकेची नौकरी सोडत नसल्याने त्याचा अपमान होवू लागला. तो अपमान सहन न झाल्याने पतीने पत्नीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
केज तालुक्यातील तांबवा येथे सुंदर बळीराम मुंडे (५५) याने पत्नी ललिता मुंडे (४५) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत:हीे शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजी चाटे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी ललिता मुंडे ही अंगणवाडी सेविकेची नौकरी सोडत नसल्याने त्याचा अपमान होवू लागला. तो अपमान सहन न झाल्याने सुंदर मुंडे याने पत्नीचा खून करुन स्वत: आत्महत्या केली. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि.नागटिळक हे करीत आहेत.
Add new comment