लाइव न्यूज़
जिल्हा रूग्णालयातून पळालेला कैदी पोलिसांच्या जाळ्यात
Beed Citizen | Updated: March 27, 2018 - 4:21pm
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेला कैदी ज्ञानेश्वर जाधव हा काल सायंकाळी फरार होण्यात यशस्वी झाला होता. सदरील प्रकरानंतर पोलिसांनी रात्रभर शोध घेत आज पहाटे रेणापूर (जि.लातूर) येथून त्यास जेरबंद केले आहे. दरम्यान रेणापुर येथील प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या फरार कैद्याच्या मुसक्या आवळल्याने पोलिस अधिकार्यांचे कौतुक होत आहे.
बीड येथील कारागृहातील कैदी ज्ञानेश्वर जाधव याने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये असफल झाल्यानंतर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांच्या हतावर तुरी देत अखेर ज्ञानेश्वर जाधव फरार झाला. पोलिसांनी फरार झालेला या कैद्याचा रात्रभर शोध घेत होते. खबर्याने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार पळून गेलेल्या कैद्याची प्रेयसी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे संस्कार कॉलनीत रहात असल्याचे सांगितले. ही माहिती बीडच्या शिवाजी नगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी ट्रॅप लावला. मंगळवारी पहाटे पोलिसांचे पथक रेणापूर येथे पोहचले. पहाटेच त्या प्रेयसीच्या घराची झाडाझडती केली असता कैदी ज्ञानेश्वर जाधव तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.
Add new comment