Add new comment

मार्च एण्डची घाई; पालिकेच्या वसुली विभागातील सुट्ट्या रद्द शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत कर स्विकारणार-डॉ.जावळीकर

बीड, (प्रतिनिधी):- मार्च एण्डच्या पार्श्‍वभुमीवर पालिकेची कर वसुली मोहीम जोरात सुरु आहे. त्याच पार्श्‍वभुमीवर पालिकेतील वसुली विभागात कार्यरत सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असुन शनिवार दि.३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कर स्विकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी दिली आहे.
बीड नगरपालिकेतील सन २०१७-१८ वर्षातील वसुली मोहिम जोरात सुरु आहे. मार्चएण्डमुळे वसुली विभागातील कर्मचार्‍यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि.२९ आणि ३० मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही वसुली विभागातील सर्व कर्मचारी कर वसुलीचे काम सुरु ठेवणार आहेत. दि.३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालय चालू ठेवून कर वसुलीचे काम सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी म्हटले आहे. शहरातील सर्व जनतेने आपल्याकडील सर्व भरणा करुन पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.जावळीकर यांनी केले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.