लाइव न्यूज़
बीडमध्ये रामनवमीचा उत्साह भव्य दिव्य रॅली; दुपारनंतर शोभायात्रा
बीड, (प्रतिनिधी):- श्रीराम नवमीनिमित्त जिल्हाभरात सकाळपासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बीड शहरात बार्शीनाका येथून भव्य-दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगव्या पताकांनी लक्षवेधी ठरलेली रॅली शहरातील आंबेडकर चौक-माळीवेस-धोंडीपुरा-बलभीम चौक-बशिरगंज-शिवाजी चौक-नगरनाकामार्गे पुन्हा साठे चौक या रस्त्यावरुन आंबेडकर चौक येथे पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारनंतर कंकालेश्वर मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
बीडमध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बार्शीनाका येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या पताका आणि मुखी राम नामाचा गजर रॅली दरम्यान पहायला मिळाला. शहरातील विविध भागातून रॅलीचा आंबेडकर चौकात समारोप झाला. दुपारनंतर कंकालेश्वर मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असुन यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प.वासुदेव आर्वीकर (धुळे) उपस्थित राहणार आहेत.
शोभायात्रेस बहुसंख्येने उपस्थित रहा-परशुराम गुरखुदे
बीड शहरात भव्य-दिव्य स्वरुपात श्रीराम जन्मोत्सवनिमित्त शोभायात्रा या वर्षीही निघत आहे. यानिमित्त आज २५/३/२०१८ दुपारी ३ वा. कनकालेश्वर मंदिर येथून भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प.वासुदेव आर्वीकर, धुळे उपस्थित राहणार आहेत.
बीडच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणारी अशी शोभायात्रा निघणार असुन विविध पक्ष, संघटनांच्या माध्यमातून संघटीत शक्ती वाढलून एकोपा निर्माण होणार आहे. प्रभु श्रीराम हे समस्त हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय आहे. बीडमध्ये निघणार्या ह्या शोभायात्रेत जात, पात, मतभेद विसरुन आपल्या संघटन शक्तीचे प्रदर्शन करावे यानिमित्त ह.भ.प.धोंडीराजशास्त्री महाराज पाटांगणकर, ह.भ.प.तिर्थराज महाराज पठाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरीही सर्व हिंदू बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांनी केले आहे.
Add new comment