बीड शहर

पोलिस भरती प्रक्रियेमुळे वाहतुकीत बदल

बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा पोलिस दलाची भरती प्रक्रिया आजपासुन सुरु झाली आहे. उद्या दि.१३ मार्च पासुन दररोज चर्‍हाटा रोड याठिकाणी १६०० मीटर धावण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

बीडच्या झमझम कॉलनीतील ‘त्या’ खुल्या जागेत उद्यान करा नागरिकांची एकमुखी मागणी

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी भागात सर्व्हे नं.२७/आ मधील ३० गुंठे खुली जागा असुन त्या जागेत अमृत अभियानातर्ंगत उद्यान करावे अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागात उद्यान झाल्यास येथील रहिवाश्याना मोठा दिलासा मिळेल शिवाय या भागाची शोभा वाढेल.

बीडच्या शेतकरी सुकाणू समितीचे १९ मार्च रोजी अन्नत्याग

बीड, (प्रतिनिधी):- राज्यभर शेतकरी आंदोलनाचे बिगुल वाजले असुन बीड येथील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्यावतीने दि.१९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कालिदास आपेट यांनी दिली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे वडील माणिकराव साहेबराव जगताप यांचे निधन

बीड प्रतिनिधी:-शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे वडील माणिकराव साहेबराव जगताप यांचे वृद्धपकाळाने बीड येथे दुःखद निधन झाले,मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते .
बीड तालुक्यातील केतुरा येथील मूळ रहिवाशी असलेले माणिकराव जगताप पंचक्रोशीत सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून परिचित होते.
मागील आठवडा भरापासून ते अत्यवस्थ होते,वृद्धपकाळाने त्यांची प्रकृती खालावली होती,त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते,शनिवारी त्यांना बीड येथे आणण्यात आले होते ,शहरातील फिनिक्स रुग्णालयात त्यांना दाखल केले होते,रविवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली .

केंद्रीय निबंधक डॉ.सय्यद हसन अब्बास यांची शिवशारदा मल्टिस्टेटला भेट

बीड (प्रतिनिधी) फेडरेशन आँफ मल्टिस्टेट को-आँप क्रेडिट सोसायटी च्या वतीने बीड येथे आयोजित केलेल्या  सहकार परिषदेनिमित्त बीड मध्ये आलेले भारत सरकारचे केंद्रीय निबंधक डॉ.सय्यद हसन अब्बास यांनी येथील शिवशारदा मल्टिस्टेटच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी शिवशारदा मल्टिस्टेटच्या कामकाजाचे कौतूक करुन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 

वृद्ध शेतकर्‍यास रॉकेल टाकून पेटवले पैसे मगितल्याच्या राग ; वृद्धाची मृत्यूशी झुंज

बीड, (प्रतिनिधी):- वृद्ध शेतकरी गाय विक्रीच्या व्यवहारातील पैसे मागण्यासाठी सकाळीच दारात आल्याचे पाहून खरेदीकर्त्याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे देत नाही काय करायचे तर कर , असे म्हणत त्याने धुडकावून लावल्यानंतर वृद्धाने गाय सोडून घेवून जातो अशी धमकी देताच चौघांनी वृद्ध शेतकर्‍याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना येवलवाडी ( ता. पाटोदा ) येथे आज सकाळी घडली. सदरील वृद्ध गंभीररित्या  भाजला असून जिल्हा रुगणलयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भाजपकडुन नुसत्या घोषणांची मुक्ताफळे अंमलबजावणी मात्र शुन्य -कुंडलिक खांडे

बीड, (प्रतिनिधी) :- गेल्या ५ मार्चपासून जिल्हा शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकर्‍यांच्या दारोदार जाऊन चर्चा करणार्‍या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज दि ११ मार्च रोजी लिंबागणेश सर्कलमधील लिंबागणेशसह मोरगाव, मुळुक, मसेवाडी या गावातील शेतकर्‍यांच्या भेटी घेण्यात आल्या.

शिवसेनेच्या आ. निलमताई गोऱ्हे यांनी उचलली पञकार भास्कर चोपडेंच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी

?बीड, (प्रतिनिधी):- जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे  गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत 

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- पाली येथील बिंदुसरा धरणाजवळ असलेल्या झाडीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान मयताजवळ चिठ्ठी सापडली असुन त्यामध्ये सासरकडील लोकांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

ऊसतोड मजुर महिलेस सात दिवस डांबून ठेवत मारहाण

महिला गंभीर जखमी; मुकादमासह पाचविरुद्ध पोलिसात तक्रार

बीडमध्ये साटंलोटं तरीही आरोग्य प्रशासनाचे हाताची घडी तोंडावर बोटं! हॉस्पीटल-सोनोग्राफी सेंटरवाल्यांची मिलिभगत कोणाच्या पथ्थावर?

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील काही हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांची सुरु असलेली मिलीभगत सामान्य रुग्णांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटणारी आहे. आला रुग्ण की पाठवा सोनोग्राफी सेंटरकडे असाच काहीसा फंडा काही डॉक्टरांनी अवलंबविला आहे. हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांच्या मिलीभगतचे आणि साटंलोटं असल्याचे संकेत मिळत असुन आरोग्य प्रशासनाची हाताची घडी आणि तोंडावर बोटं पहायला मिळत  आहे. यासर्व बिभत्स प्रकाराकडे वरिष्ठ दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यात खळबळ एक हत्या ; चौघांची आत्महत्या

बीड : जिल्ह्यासाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. एकीची हत्या तर चौघांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. बीडमध्ये जावयाने गळफास लावून जीवन संपविले.केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एका विद्यार्थीनीची हत्या करून युवकाने आत्महत्या केली. तर तेथीलच जवळबन सेवासोसायटीच्या चेअरमनने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला. युसुफवडगाव येथे नवमहिन्यापुर्वी विवाह झालेल्या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. या विविध घटनांमुळे यम जिल्ह्यात मुक्कामी होता की काय? असा प्रश्‍न उपस्थितीत होत आहे.

राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध

बीड (प्रतिनिधी)
 
महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदासाठी बीड, धाराशिव मतदारसंघातुन येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची आज बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री ना. पंकजाताईंकडून सलीम जहॉंगिर यांच्या मागणीची दखल वाळू घाटांच्या लिलावातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने बांधकाम व्यावसायिक , कामगार , मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात गुरुवारी ( दि. ८ ) मुंबईत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेत  जिल्हा भाजप नेते सलीम जहॉंगिर यांनी  वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत ना. पंकजाताई यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून लिलाव प्रक्रियेशी संबधित माहिती जाणून घेत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर दोन दिवसापासून ठिय्या!

मागण्या तात्काळ मार्गी लावा नसता उपोषण सुरुच-भोसले, पठाण, डावकर

नूर कॉलनीतील पाईप लाईनचा प्रश्‍न लागला मार्गी

बीड, (प्रतिनिधी):- शिवणी रोड लगत असलेल्या नूर कॉलनी येथील पाईप लाईनचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित होता. नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला असुन नागरिकांमधुन आनंद व्यक्त केला जात आहे. पाणी पुरवठा सभापती शेख मुखीदलाला यांनीही या पाईपलाईनच्या प्रश्‍नासंदर्भात नगराध्यक्ष यांना विनंती केली होती.

बीड पालिकेची ना करवाढ, ना दरवाढ डॉ. भारतभूषण यांचा नागरिकांना दिलासा

बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिका सामान्य नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळेच गतवर्षी पेक्षा जास्तीच्या निधीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यावर्षी तब्बल २८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अन्य पालिकांमध्ये १० टक्क्याने करवाढ केली जाते मात्र बीड पालिकेत गेल्या २३ वर्षांप्रमाणे यावर्षीही कसल्याही प्रकारची करवाढ , दरवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

Pages