सुक्ष्मसिंचनासाठी १४ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर
बीडसह मराठवाड्यातील शेतकर्यांना दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत मिळणार अनुदान
बीड, (प्रतिनिधी):- मराठवाड्यातील सततच्या दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा उद्देश समोर ठेवून राज्य शासनाने सुक्ष्म सिंचन योजनेसाठी १४ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे. या बाबत राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन विभागाने शासन निर्णय जारी केला असुन बीडसह मराठवाड्यातील शेतकर्यांना दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. सदरील योजनेवर नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीडसह मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणार्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शंभर टक्के राज्यपुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना राबविण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आलेला आहे.सदरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी १४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी कृषि व पशुसंवर्धन विभागाने आज मंजुर केला आहे. या बाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आला असुन योजनेतर्ंग पिकसंवर्धन, बागायती व भाजीपाला पिके, रोपमळे आदिंसाठी सुक्ष्म सिंचनाकरिता अनुदान देण्यात येणार आहे. मराठवाडा विभागातील शेतकर्यांना दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर निधीचे जिल्हानिहाय वितरण करण्यास तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषि संचालक (फलोत्पादन) यांना राज्य नियंत्रक म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय स्तरावर संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी आणि तालुकास्तरावर संबंधित तालुका कृषि अधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Add new comment