बीडच्या शेतकरी सुकाणू समितीचे १९ मार्च रोजी अन्नत्याग

बीड, (प्रतिनिधी):- राज्यभर शेतकरी आंदोलनाचे बिगुल वाजले असुन बीड येथील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्यावतीने दि.१९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कालिदास आपेट यांनी दिली आहे.
बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिलगव्हाण जि.यवतमाळ येथिल शेतकरी स्मृतीशेष साहेबराव करपे पाटील आणि मालती करपे या सुशिक्षित दाम्पत्त्याने १९ मार्च १९८६ रोजी कुटूंबासह आत्महत्त्या केली.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४२ एकर जमिन असुनही मी स्वाभिमानाने जगू शकत नाही.अशी चिट्टी प्रेतासोबत मिळाल्याने देशभर एकच खळबळ उडाली. आज या घटनेला ३२ वर्ष उलटली.दरम्यान ७५००० शेतकर्‍यांचे महाराष्ट्रात सरकारी धोरणाने बळी घेतले आहेत.तरिही शेतकरी आत्महत्त्येबाबत कुठलेही सरकार गंभिर नाही.२२ जानेवारी २०१८ रोजी विखरण जि.धुळे येथिल धर्मा पाटील यांनी थेट मंञालयात मुख्यमंञ्यांच्या दालनात विष प्राशन करुन आत्महत्त्या केली. याबाबत दंडाधिकारी म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे.
१९ मार्च रोजी सकाळी आपल्या कार्यालयासमोर अन्नदात्त्यासाठी ’अन्नत्याग’ आंदोलन शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. निवेदनावर कालिदास आपेट, प्रा.सुशिला मोराळे, डॉ.अजिमोद्दीन शेख, रामेश्वर गाढे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.