नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- नापिकीला कंटाळून एका ३० वर्षीय शेतकर्‍याने शिरापुर धुमाळ येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सिद्धार्थ अंकुश औसरमल (३०) या तरुण शेतकर्‍याने सततची नापिकी व मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील शिरापुर धुमाळ येथील रहिवाशी औसरमल यांनी नापिकी व मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा या विंवचनेतून आत्महत्या केली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे अनेक तरुण शेतकरी स्वत:चा जिव देत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.