लाइव न्यूज़
बीडच्या झमझम कॉलनीतील ‘त्या’ खुल्या जागेत उद्यान करा नागरिकांची एकमुखी मागणी
Beed Citizen | Updated: March 12, 2018 - 2:58pm
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी भागात सर्व्हे नं.२७/आ मधील ३० गुंठे खुली जागा असुन त्या जागेत अमृत अभियानातर्ंगत उद्यान करावे अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागात उद्यान झाल्यास येथील रहिवाश्याना मोठा दिलासा मिळेल शिवाय या भागाची शोभा वाढेल.
बीड शहरात नगरपालिकातर्ंगत विविध वार्डात एकुण ३५ उद्यान केंद्र शासनाच्या योजनेनुसार बनविण्यात येत आहे. झमझम कॉलनी सन २००४ पासुन अस्तित्वात आलेली आहे. एनए लेआऊट व सर्व सोयीनींयुक्त असलेल्या कॉलनी सर्व्हे नं.२७ आ मध्ये नगरपालिकेची ३० गुंठे खुली जागा आहे. याठिकाणी अमृत अभियानातर्ंगत उद्यान उभारल्यास या भागाची शोभा वाढेल आणि नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. या प्रश्नी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी लक्ष घालून याठिकाणी उद्यान करावे अशी मागणी समीर, खालेदउल्लाह, शेख इम्रान, सिद्दीकी अहेतशाम, रिजवान खान, ऍड.साजिद, शेख, उमर फारुख, वकील सर, मुसा पटेल, अहेमद भाई, शेरु भाई आदिंनी केली आहे.
Add new comment