Add new comment

अंबाजोगाईजवळ गुटखा लुटणारे संशयित पकडले

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):- अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत काही दिवसांपुर्वी गुटखा, पानमसाला वाहतुक करणार्‍या वाहनांना अडवून त्यातील माल लुटण्यात आला होता.या प्रकरणातील पाच संशयित ग्रामीण पोलिसांनी पकडल्याचे वृत्त आहे. दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी संशयितांची कसुन चौकशी करण्यात येत होती.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापुर्वी गुटखा, पानमसाल्याची वाहतुक करणारी वाहने अडवून त्यातील लाखोंचा माल लंपास केला होता. गुटखा, पानमसाला विक्रीला बंदी असतांनाही संबंधित वाहनचालकाने दिलेल्या तक्रारीवरुन अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने चर्चेला उत आला होता. या प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाहन लुटल्याप्रकरणात त्यांच्याकडे कसुन चौकशी केली जात असुन या प्रकरणाचा अधिक तपास पोनि.गंदम हे करीत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.