लाइव न्यूज़
केंद्रीय निबंधक डॉ.सय्यद हसन अब्बास यांची शिवशारदा मल्टिस्टेटला भेट
बीड (प्रतिनिधी) फेडरेशन आँफ मल्टिस्टेट को-आँप क्रेडिट सोसायटी च्या वतीने बीड येथे आयोजित केलेल्या सहकार परिषदेनिमित्त बीड मध्ये आलेले भारत सरकारचे केंद्रीय निबंधक डॉ.सय्यद हसन अब्बास यांनी येथील शिवशारदा मल्टिस्टेटच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी शिवशारदा मल्टिस्टेटच्या कामकाजाचे कौतूक करुन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
फेडरेशन आँफ मल्टिस्टेट को-आँप क्रेडिट सोसायटी च्या वतीने बीड येथे आयोजित केलेल्या सहकार परिषदेनिमित्त बीड मध्ये आलेले भारत सरकारचे केंद्रीय निबंधक डॉ.सय्यद हसन अब्बास यांनी येथील शिवशारदा मल्टिस्टेटच्या कार्यालयाला भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत जेष्ठ विधिज्ञ अँड.एस.एस.गडगे,फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवशारदा मल्टिस्टेट चे संस्थापक चेअरमन जयसिंह पंडित यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी अब्बास यांनी शिवशारदा च्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. कमकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीने ग्रामीण भागातील जनता,व्यापारीआणि लघुउद्योजकांना आर्थिक उर्जा देण्याचे काम केले आहे. सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट क्रेडीट सोसायट्यांच्या पायाभरणीमुळे
राज्यातील आर्थिक स्तर उंचावला आहे.बीड सारख्या ग्रामीण भागात जयसिंह पंडित यांनी शिवशारदा मल्टिस्टेटची स्थापणा करुन सहकारी चळवळ भक्कम केली.शिवशारदा मल्टिस्टेटची आर्थिक परिस्थिती चांगली असून ही संस्था या भागात जनता,शेतकरी,व्यापारी आणि ग्राहकांना वरदान ठरेल असा विश्वास डॉ. अब्बास यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे संचालक बंडू मोटे सरव्यवस्थापक अजिंक्य लेंडे,अशोक दहीवाळ,राहुल पवार,किशोर लोणकर,गणेश रुकर,गोपाळ मिरपगार आणि शिवशारदा मल्टिस्टेटचे कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Add new comment