लाइव न्यूज़
पोलिस भरती प्रक्रियेमुळे वाहतुकीत बदल
Beed Citizen | Updated: March 12, 2018 - 3:08pm
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा पोलिस दलाची भरती प्रक्रिया आजपासुन सुरु झाली आहे. उद्या दि.१३ मार्च पासुन दररोज चर्हाटा रोड याठिकाणी १६०० मीटर धावण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
बीड शहरात पोलिस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उद्या दि.१३ मार्च पासुन २२ मार्च पर्यंत चर्हाटा रोड याठिकाणी १६०० मीटर धावण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने चर्हाटा फाटा ते उखंडा फाटा मार्गे जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून पाटोद्याकडून येणारी सर्व वाहने उखंडा फाटा, गजानन कारखाना मार्गे बीडकडे येतील. बीडकडून चर्हाटा मार्गे जाणारी सर्व वाहने चर्हाटा फाटा, मुर्शदपुर फाटा, गजानन कारखाना, उखंडा फाटामार्गे पाटोदा रोडने जातील. चर्हाटाकडील वाहने उखंडा फाटा, गजानन कारखानामार्गे बीडकडे येतील अशी माहिती पोलिस अधिक्षकांकडून कळविण्यात आली आहे. सदरील अधिसूचना अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने (कार्यक्रमानिमित्त येणारे महत्वाच्या व अति महत्वाच्या व्यक्तींच्या) व इतर आवश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
Add new comment